pankaja Munde Sakal
नाशिक

'आदळआपट अन् दबंगगीरीशीवाय महिलांची कामे होत नाहीत' - पंकजा मुंडे

विनोद बेदरकर

नाशिक : महिला लोकप्रतिनिधीची  विकास काम सहज होत नाहीत. खूप आदळआपट करावी लागते. दंबगपणा केल्याशिवाय विकासकाम होत नाही, अशा शब्दात माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राजकारणातील महिलां लोकप्रतिनिधीच्या व्यथा मांडल्या. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचा भूमीपूजन आज माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहूणे म्हणून माजी पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाहून श्री भुजबळ बोलत होते. महापौर सतीश कुलकर्णी, आमदार प्रा.देवयानी फरांदे, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्षगिरीष पालवे आदीसह नगरसेवक उपस्थित होते.

मुंडे म्हणाल्या की, भुजबळ साहेब माझ्या वडीलांचे मित्र आहेत. वय, अनुभवासह अनेक आधिकारांनी ते ज्येष्ठ असूनही त्यांनी सत्कार करुन माझा सन्मान वाढविला. असे गैरवोद्गार माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी काढले. धूर ओकणाऱ्या कारखानदारीतून औद्योगिक विकासापेक्षा शिक्षण,वैद्यकिय आणि पर्यटन विकास या त्रिसूत्रीवर नाशिकचा विकासाची दिशा असावी. यंदाच्या दिवाळीत नाशिककरांनी हाच संकल्प करावा असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

भुजबळ म्हणाले की, नाशिकचे हवामान ही जमेची बाजू आहे. इथल्या वातावरणाला पूरक अशा स्वरुपाची नाशिकच्या विकासाची दिशा असावी.वैद्यकिय उपचारासाठी उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांनी मुंबई पुण्याऐवजी नाशिकला यावे. शिक्षण व पर्यटनासाठी नाशिकला यावे धार्मिक, कला, साहित्य, क्रिडा क्षेत्रात नाशिकचा विकास झाला पाहिजे, व्हर्टीकल ऐवजी होरोझोन्टल दिशेने नाशिकची वाढ व्हावी असा दिवाळी निमित्ताने नाशिककरांनी नियोजनासाठी संकल्प करावा असे आवाहान केले. ओबीसी व्हीजेएनटी प्लॅटफॉर्म जयकुमार रावल यांनी राजकारणा पक्षीय भूमिका भिन्न असल्या तरी, ओबीसी-व्हीजीएनटी यांच्या विकासासाठी राजकारण विरहित आघाडीचीगरज आहे. असे आवाहान करतांनाच, पर्यटन मंत्री म्हणून मला जेवढी कामे करता आले नाही तेवढी कामे प्रा. फरांदे यांनी केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT