A rush of teachers from the profession sector to meet the Chief Executive Officer Ashima Mittal in the Zilla Parishad esakal
नाशिक

PESA Teacher Recruitment : पेसा शिक्षक भरतीसाठी समांतर आरक्षण जाहीर; शिक्षकांच्या जि. प. वर धडकेनंतर कार्यवाही

सकाळ वृत्तसेवा

PESA Teacher Recruitment : जिल्हयातील आदिवासी तालुका (पेसा) क्षेत्रातील शिक्षक पदभरतीच्या जाहीर झालेल्या वेळापत्रकात शिक्षक भरतीचे समांतर आरक्षण जाहीर केलेले नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या पेसा शिक्षकांनी शुक्रवारी (ता.१५) जिल्हा परिषदेला धडक देत विचारणा केली.

त्यानंतर शिक्षण विभागाने तत्काळ समांतर आरक्षण जाहीर केले. जिल्हा परिषदेच्या बेवसाईटवर हे आरक्षण टाकण्यात आलेले आहे. कोणीही संभ्रम निर्माण करू नये असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केले. (Parallel reservation announced for PESA teacher recruitment nashik news)

जिल्हयातील आदिवासी तालुका (पेसा) क्षेत्रातील शिक्षकपद भरतीस शासनाने परवानगी दिल्यानंतर, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने भरती प्रक्रीया सुरू केली आहे. राज्यस्तरावरून शिक्षकांची यादी प्राप्त झाली असून, पडताळणी वेळापत्रक विभागाने जाहीर केले आहे.

त्यानुसार, यादीची शनिवारी (ता.१६) व रविवारी (ता.१७) पडताळणी केली जाणार आहे. गुणवत्ता यादी व कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक नाशिक जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर प्रसिध्द देखील करण्यात आले.

मात्र, यात शिक्षकांचे समांतर आरक्षण जाहीर केलेले नव्हते. तसेच कोणत्या विषयांसाठी नेमके किती शिक्षकांची नियुक्ती होणार याबाबतची माहिती नसल्याने पेसा क्षेत्रातील व यादीत नावे असलेल्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेवर शुक्रवारी धडक मारली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावेळी शिक्षकांच्या शिष्टमंडलाने थेट मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेत ही बाब निर्देशनास आणून दिली. त्यानंतर श्रीमती मित्तल यांनी लागलीच शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांसह संबंधित अधिका-यांना पाचारण करत विचारणा केली. यात समातंर आरक्षण विभागाने निश्चित करण्यात आलेले आहे.

तसेच विषयानुसार शिक्षकांची संख्या ही कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर निश्चित होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी लागलीच समांतर आरक्षण जाहीर केले. उमेदवारांना हे आरक्षण पाहता यावे यासाठी वेबसाईटवर देखील ते प्रसिध्द करण्यात आलेले असल्याचे बच्छाव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT