नाशिक : गंगापूर रोडवरील होरायझन स्कूलच्या काही पालकांनी शुल्कवाढीविरोधात सोमवारी (ता. २०) आक्रमक पवित्रा घेतला. मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय गाठत पदाधिकाऱ्यांची भेट घेत पालकांनी गाऱ्हाणे मांडले. वाढीव शुल्कवाढीबाबत पुनर्विचार करण्याबाबत निवेदन या वेळी देण्यात आले. (Parents aggressive against increase in fees meeting held with officials of institution regarding Horizon School Nashik News)
सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पालकांनी संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय गाठले. तक्रारकर्त्या पालकांच्या म्हणण्यानुसार शाळेने केलेली शुल्कवाढ ही अन्यायकारक आहे. पालकांना यासंदर्भात पूर्वकल्पना न देताच शुल्कवाढ करण्यात आली.
वाढीव शुल्काबाबत संस्थेच्या मार्फत पुनर्विचार करण्यात यावा, याबाबत मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. दुपारी उशिरापर्यंत पालक कार्यालयाच्या आवारात ठाण मांडून बसलेले होते.
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
शुल्कवाढ नियमानुसार, शालेय प्रशासनाचे म्हणणे
सदर शुल्कवाढीबाबत पालक- शिक्षक संघाची मान्यता घेतलेली असून, ही वाढ नियमाप्रमाणेच असल्याचे शालेय प्रशासनाचे म्हणणे आहे. यापूर्वी शासनाच्या आदेशानुसार अनेक पालकांना शुल्कात सवलती दिलेल्या आहेत.
‘पीटीए’च्या निर्णयानुसार शुल्कवाढ लागू केली असून, याबाबत काही पालकांपर्यंत माहिती पोचलेली नव्हती. इंधनाचे दर वाढले असल्याने स्कूल बसच्या शुल्कात वाढ करावी लागली. विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या उपक्रमाच्या शुल्काचा समावेश यात आहे. पालकांमध्ये शुल्काविषयी संभ्रम दूर केला जाईल, असेही सांगण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.