Towing esakal
नाशिक

Parking Problem : टोइंग थांबल्याने चालकांच्या बेशिस्तीत वाढ! नवीन ठेकेदारासाठीची प्रक्रिया संथगतीने

सकाळ वृत्तसेवा

Parking Problem : पोलिस आयुक्तालयाने शहरातील रहदारीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांची टोइंग करणे बंद केले आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी असलेल्या नो- पार्किंगमध्ये वाहनांची सर्रास पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे.

तर दुसरीकडे आयुक्तालयाकडून नवीन ठेकेदार नेमण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असली तरी ती अत्यंत संथगतीने सुरू आहे.

यामुळे शहराच्या मध्यवर्ती व रहदारीच्या ठिकाणी बेशिस्त वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला सर्वसामान्यांना सामोरे जावे लागते आहे. (Parking Problem Increase in drivers indiscipline due to stopping of towing process for new contractors slow nashik news)

शहर पोलिस आयुक्तालयातर्फे श्रमसाफल्य या टोइंग ठेकेदारामार्फत कारवाई केली जात होती. गेल्या वर्षी ठेकेदाराची मुदत संपली असता, त्यास तत्कालीन पोलिस आयुक्तांनी मुदतवाढ दिली होती. मात्र, १५ मार्चपासून विद्यमान पोलिस आयुक्तांनी सदरील टोइंग ठेकेदारास मुदतवाढ दिली नाही.

त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून शहरात नो- पार्किंगमधील वाहनांविरोधातील टोइंग कारवाई थांबली. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला. टोइंग कर्मचारी, वाहतूक पोलिस आणि वाहनधारक यांच्यातील वादाचे खटके थांबलेले आहेत.

तर, बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक शाखेतील पोलिस अंमलदारांनी ई- चलनाद्वारे दंडात्मक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले होते. परंतु, वाहतूक शाखेकडून ठराविक ठिकाणी आणि तेही वाहतूक सिग्नलवरच बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध ई- चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे.

तर, नो-पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांवर वाहतूक शाखेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या बेशिस्त वाहनचालकांची मुजोरी वाढली आहे. या बेशिस्त वाहनांच्या पार्किंगमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होते आहे. या नित्याचा त्रास सर्वसामान्य नाशिककरांना सहन करावा लागतो आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या ठिकाणी नित्याची कोंडी

स्मार्ट रोड, एमजी रोड, शिवाजी रोड, शालिमार, सिटी सेंटर मॉल, शरणपूर रोड, कॅनडा कॉर्नर, ठक्कर बाजार, झेडपी रोड या ठिकाणी नो-पार्किंगच्या असताना रस्त्याच्या कडेला चारचाकी व दुचाकी वाहनांची पार्किंग केली जाते.

टोइंग सुरू असताना याच ठिकाणांवरून सर्वाधिक वाहनांची टोइंग होत असे. टोइंग बंद झाल्यापासून या ठिकाणी बेशिस्त वाहनचालक बिनधास्तपणे आपली वाहने पार्क करून जातात. काही रस्त्यालगत तर वाहनांच्या दोन रांगा लागत आहेत.

यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने उद्‌भवते आहे. याकडे वाहतूक पोलिसांकडूनही सोईस्कररीत्या दुर्लक्ष होते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT