जुने नाशिक : शहरभर स्मार्टसिटीअंतर्गत कामे सुरू आहे. बहुतांशी भागात अर्धवट कामे झाले आहे. खोदकाम झालेल्या भागांची दुरुस्तीचे काम बंद आहे. त्यामुळे जागोजागी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पावसाने रस्त्यावरील त्या चिखलाने वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहे. (Part time work of smart city leads to mud in places nashik rain latest Marathi news)
त्र्यंबक रोड, खडकाळी, दहिपूल, जुने नाशिक, गंगा गोदावरी परिसरासह ठिकठिकाणी विविध प्रकारचे कामे सुरू आहे. नियोजनशून्य कामामुळे तसेच स्मार्टसिटीचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे काही भागातील कामे बंद आहे.
तर, काही भागांमध्ये अर्धवट कामे करून बंद केली आहे. अशा अर्धवट झालेल्या कामाच्या ठिकाणी खोदकामातून निघालेल्या मातीचा चिखल झाला आहे. सतत पाऊस सुरू असल्याने चिखलातून वाहने घसरून अपघात घडत आहे.
असेच काहीशी चित्र गंजमाळ सिग्नल त्र्यंबक रोड तसेच खडकाळी परिसरात बघावयास मिळत आहे. याठिकाणी मुख्य रस्ते खोदून त्यात पाइपलाइन टाकून रस्ते बंद करण्यात आले आहे. त्यांचे अर्धवट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे, तर काही भागात काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण झालेले नाही. रस्त्याच्या कामांसाठी खोदलेले दुभाजकांची दुरुस्ती करण्यात आली नाही.
अशा भागांमध्ये पडलेल्या मातीचा पावसामुळे चिखल झाला आहे. हा चिखल अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. कामे करताना नियोजनपूर्वक कामे केली गेली असती, तर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली नसती.
दरम्यान, पावसात खोदकाम करण्यास महापालिकेकडून प्रतिबंध करण्यात आला होता. तरीदेखील बहुतांशी ठिकाणी खोदकाम करून अर्धवट कामे करण्यात आली आहे. खडकाळी परिसरात पाइपलाइन टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्याचे पूर्णपणे कामे करण्यात आली नाही.
त्यामुळे दुभाजक भागात चिखल झाल्याचे बघावयास मिळत आहे. अशा प्रकारची अर्धवट झालेली कामे पूर्णत्वास नेऊन अपघात टाळावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.