Construction of partial bridge over Mosam river near Jad village. esakal
नाशिक

Nashik: पुलाचे अर्धवट बांधकाम ठरतेय धोकादायक! ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी होणार गैरसोय

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जाड (ता. बागलाण) गावाजवळील मोसम नदीवरील पुलाचे काम अर्धवट राहिल्याने येथील ग्रामस्थांना दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली असून संबंधित विभागाने तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात मोठी दुर्घटना होऊ शकते.

तसेच या गावांचा इतर गावांसोबत असलेला संपर्क तुटण्याची भीती असल्याने संबंधित विभाग, ठेकेदार यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करून गंभीर समस्येचे निराकरण करावे अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. (Partial construction of bridge dangerous Students and villagers will face inconvenience during rainy season at jad Nashik)

महाराष्ट्र- गुजरात व नाशिक -धुळे जिल्ह्याच्या सरहर्दीवर बागलाणचे माजी आमदार लहानू अहिरे यांच्या गावाजवळ असणाऱ्या जाड नदीवर पुलाचे काम सुरू आहे. मात्र या पुलाचे बांधकाम अतिशय संथगतीने सुरु असल्याने आता पावसाळ्यात हा पूल पूर्ण न झाल्याने गावाला धोका पोचण्याचा शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.

सदर पुलाचे बांधकाम होत असलेल्या ठिकाणाच्या जवळ असलेल्या नदीपर्यंत हरणबारी धरणाचा फुगवटा पश्चिम दिशेला येत असल्याने अतिवृष्टी झाल्यास मोठ्या प्रमाणात या नदीला पूर येत असतो.

संबंधित ठेकेदार यांना अहिरे , स्थानिक नागरिकांनी पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी लवकर करावे अशी वेळोवेळी विनंती केल्यानंतरही ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यामुळे काम अर्धवट राहिले आहे.

नदीला आता पाणी असल्याने व पर्यायी रस्ता व्यवस्थित नसल्याने जाड व येथील सर्व पाड्यांसह आलियाबाद, गोळवाड, सेंद्रिचापाडा, धनाळेपाडा, गावंदरपाडा, मोहळागी, बोराटे इत्यादी स्थानिक आदिवासी गावांचा संपर्क तुटला आहे.

तसेच शाळा, कॉलेजचे विद्यार्थी यांचे शैक्षणिक व शेतकऱ्यांचे शेती पिकांचेही नुकसान होणार आहे. पश्चिम आदिवासी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने रुग्णांची आजारी पडल्यास आलियाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात घेऊन जाणे,

शेतीमाल मार्केटला विकणे, स्वस्त धान्य दुकानामार्फत मिळणारा शिधा , किराणा, शेती बियाणे इत्यादी वस्तू मिळवण्यासाठी रस्त्याची गैरसोय झाल्यास ते मिळविण्यासाठी जीवावरची कसरत करावी लागणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यासह नंदुरबार, कळवण, मालेगाव आगाराच्या प्रवासी वाहतूक या गावांना होत नसल्याने तीही गैरसोय निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने तत्काळ ग्रामस्थांसाठी पर्यायी दळणवळणाची सोय करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती पोपटराव अहिरे, राजेंद्र अहिरे, भरत चौधरी, गोळवाडचे सरपंच गंगूबाई अहिरे, सदस्य सुरेश अहिरे, धवळू सूर्यवंशी, दादू चौधरी , पोपट चौरे, राहुल अहिरे, गोकूळ कांबडी यांच्यासह असंख्य नागरिकांनी केली आहे.

"पुलाचे काम अर्धवट राहिल्याने काही गंभीर दुर्घटना घडल्यास संबंधित विभाग जबाबदार राहील. कारण या नदीला पूर येत असल्याने आजपर्यंत अनेक आदिवासी बांधव, पाळीव जनावरे वाहून गेले आहेत. त्यांचे मृतदेह थेट हरणबारी धरणात सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा अशा पद्धतीची पुनरावृत्ती होऊ नये." - गणेश अहिरे- माजी जिल्हा परिषद सदस्य, जाड

"पुलाच्या पायाकरिता आवश्यक तो खडकाचा स्तर अपेक्षित स्तरापेक्षा खाली गेल्यामुळे कामाचा वेग मंदावला. परंतु आता सदरील पूल जमीन पातळीच्या स्तरापर्यंत आला आहे. लवकरच या पुलाचे काम पूर्ण होईल."- कौस्तुभ पवार- शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT