एकलहरे (जि. नाशिक) : शिकण्याची इच्छाशक्ती असली व परिस्थिती वर मात करण्याची जिद्द असली तर वाढते वय ही त्यापुढे गौन ठरते. असेच एक प्रेरणादायी उदाहरण एकलहरेत घडले आहे.आई आणि मुलाने सोबत परीक्षा देत उत्तम गुणांनी उत्तीर्ण देखील झालेत. (Passed ssc after 22 years gap Success achieved by mother and child together Nashik Success story news)
हनुमान नगर येथील वस्तीतील सुषमा शांताराम घायवट (पूर्वाश्रमीच्या सुषमा माधवराव बोरसे) यांची माहेरची परिस्थिती गरिबीची व हलाखीची होती वडील चहाची टपरी चालवून घर चालवित होते परिस्थिती मुळे सुषमा च्या शिक्षणात खंड पडला. लग्नानंतर शिक्षणाची उर्मी शांत बसू देत नव्हती परंतु इकडची परिस्थिती ही हातावरची पती रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकत होता त्याला हातभार लावण्यासाठी सुषमा ने कंबर कसली व पंचायत समितीमध्ये (Panchayat Samiti) आशा वर्कर म्हणून नोकरी ला लागल्या व सोबत दोन मुलांचे संगोपन ही सुरू होते.
यंदा मुलगा रोहन चे दहावीचे वर्ष होते मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकत होता. सुषमाचीही शिकण्याची उर्मी जागी झाली व पती शांताराम यांनी तिला पाठिंबा दिला व परीक्षा फॉर्म नाशिकला भरण्यास अडचण आली शेवटी माहेरी बोलठाण भागातील शाळेत फॉर्म भरला व परीक्षा केंद्र सातगाव डोंगरी (पाचोरा) येथे नंबर आला. परीक्षेला जाण्यासाठी पती शांताराम पहाटे 3 वाजता उठून 4 च्या एक्स्प्रेस ने पाचोरा गाठत व सुषमा ला परीक्षा केंद्रावर सोडत होता. 22 वर्षाच्या गॅप नंतर वयाच्या 36 व्या वर्षी सुषमा ने परिस्थिती वर मात करीत दहावीत 77 व मुलगा रोहन याने 78 टक्के मिळवून उत्तीर्ण झाले. सुषमा ला अजून शिकण्याची इच्छा असून बारावी नंतर नर्सिंग चे शिक्षण घ्यायचे आहे. एकलहरे झोपडपट्टी वस्तीतून यश मिळविलेल्या या आई व लेकाचे ग्रामपंचायत तर्फे व सरपंच मोहिनी जाधव यांच्याकडून व सिद्धार्थ नगर एकलहरेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.