Cyclists on their way to Yeola Kutch Gujarat. esakal
नाशिक

Navratri Festival: येवल्यातून पटेल कुटुंबीयांची कच्छ गुजरातकडे नवरात्रीनिमित्त सायकलयात्रा रवाना!

सकाळ वृत्तसेवा

येवला : येथील कच्छ कडवा पाटीदार समाजातर्फे नवरात्रीनिमित्त येवला ते कच्छ गुजरात अशी ११०० किलोमीटर सायकलयात्रा काढण्यात आली असून, शुक्रवारी हे बांधव यात्रेस रवाना झाले. (Patel family cycle journey from Yevla to Kutch Gujarat on occasion of Navratri festival 2023 nashik)

सायकल चालविण्याचे विविध फायदे सांगत गेल्या ११ वर्षांपासून येवल्यातील कच्छ कडवा पाटीदार समाजाचे सायकल यात्रेकरू नवरात्रीनिमित्त येवला ते कच्छ गुजरात अशी ११०० किलोमीटरच्या प्रवासाला निघतात.

कोटमगाव येथील जगदंबा मातेचे दर्शन घेऊन कच्छ गुजरात येथील आशापुरा देवीच्या दर्शनासाठी शुक्रवारी रवाना झाले. या सायकल यात्रेत मुकेश पटेल, हितेश पटेल, रमेश पटेल, भावेश पटेल, कुणाल पटेल, निर्मल पटेल, धवल पटेल, पिनाल पटेल सहभागी झाले आहेत.

या यात्रेकरूंचे महिलांनी औक्षण करून ठिकठिकाणी स्वागतही करण्यात आले. येथील विंचूर चौफुलीवर माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी व सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

प्रवासादरम्यान लागणाऱ्या गावांमध्ये थांबत लोकांना सायकल चालविण्याचे फायदे यात्रेकरू सांगून समाज प्रबोधन करीत असतात. या यात्रेत तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT