NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News: रिक्तपदांचा आकृतिबंध ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मंजुरीची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

NMC News : महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा मिळालेला असल्याने नवीन आकृतिबंध सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्याअनुषंगाने विभागांकडून प्रशासनाला प्रस्ताव सादर झाले आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून नवीन आकृतिबंधाला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. (Pattern of vacancies in first week of October NMC nashik news)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

महापालिकेची स्थापना झाल्यानंतर ‘क’ वर्गात समावेश करण्यात आला. त्यानुसार आस्थापना परिशिष्टानुसार ७०९२ पदे मंजूर करण्यात आली. परंतु दरमहा सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्तीमुळे कर्मचारी संख्येत घट झाली आहे.

सद्यःस्थितीत जवळपास तीन हजार पदे रिक्त आहेत. रिक्तपदांची भरती करण्यासाठी राज्य शासनाने ३५ टक्क्यांपर्यंतची आस्थापना खर्चाची अट टाकली आहे. परंतु महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपर्यंत कधीच आला नाही.

त्यामुळे रिक्तपदाच्या भरतीला मर्यादा आल्या. त्यात सातवा वेतन आयोग व वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देय असल्याने अडचणीत अधिकच भर पडली. दरम्यान, राज्य शासनाने आठ वर्षांपूर्वी क्रिसिलच्या रेटिंगनुसार महापालिकेच्या समावेश ‘ब’ वर्गात केला.

त्यामुळे नवीन आकृतिबंध मंजूर करणे क्रमप्राप्त आहे. २०१७ मध्ये नवीन आकृतिबंधानुसार चौदा हजार पदांचा सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला. परंतु सुधारित आकृतिबंधात अस्तित्वातील पदांपेक्षा अधिक पदे वाढविल्याने शासनाने नवीन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

त्याअनुषंगाने ४९ विभागांना आवश्यक पदे, व्यपगत होणारी पदे, मंजूर पदे, कालबाह्य ठरलेली पदे असा अनुक्रम देत नवीन प्रारूप प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ४९ विभागांचे प्रस्ताव महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले.

आता प्रस्तावांची पडताळणी केली जात आहे. पडताळणीनंतर ऑक्टोबरमध्ये शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे, अशी माहिती प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.

पुढील वर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीड वर्षांपासून खोळंबल्या आहेत. त्यामुळे निवडणूक वर्षे असल्याने महापालिकेच्या नवीन आकृतिबंधाला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT