Dhananjay Munde Letter esakal
नाशिक

SAKAL Impact | उपस्थिती भत्ता किमान प्रतिदिन 20 रुपये द्या: धनंजय मुंडेंचे शिक्षणमंत्री केसरकरांना पत्र

सागर आहेर

चांदोरी (जि. नाशिक) : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण’ बातमीची दखल घेत आमदार धनंजय मुंडे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पत्र लिहून उपस्थिती भत्ता हा १ रुपयावरून प्रतिदिन २० रुपये करण्याची मागणी केली. (Pay attendance allowance at least Rs 20 per day Dhananjay Munde letter to Education Minister dipak Kesarkar SAKAL Impact)

१९९२ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून व त्यांनी दाखवलेला स्त्रीशिक्षण व सक्षमीकरणाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आदिवासी क्षेत्राबाहेरील आर्थिक दुर्बल घटकातील, तसेच अनुसूचित जाती-जमाती व भटक्या जमातींमधील पहिली ते चौथीमध्ये शिकणाऱ्या मुलींची पटसंख्या वाढावी, तसेच गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने पहिली ते चौथीत शिकणाऱ्या मुलींना प्रोत्साहनपर उपस्थिती भत्ता देण्यासाठी ‘दुर्बल घटकातील मुलींना शाळेत नियमित येण्यासाठी उपस्थिती भत्ता’ देण्याचा उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय घेतला होता.

याअंतर्गत प्रतिविद्यार्थिनी, प्रतिदिन १ रुपयाप्रमाणे भत्ता निश्चित करण्यात आलेला असून, वर्षातील एकूण उपस्थितीचे २२० दिवस ग्राह्य धरून याप्रमाणे भत्ता दिला जातो. तसेच सदर योजनेतील भत्ता वितरित करण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अद्याप निधीही उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती निदर्शनास आली आहे.

सकाळ मधील वृत्त

मागील सुमारे तीस वर्षांपासून या योजनेत काहीही बदल करण्यात आलेले नाहीत. देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव आपण साजरा करत असताना दुसरीकडे महागाई आकाशाला गवसणी घालत आहे. अशा परिस्थितीत सावित्रीबाईंच्या नावाने दिल्या जाणाऱ्या या भत्त्याची एक रुपया रक्कम ही शालेय मुलींची चेष्टा करणारी आहे.

आजच्या बाजार भावानुसार एक रुपयात एक पेन्सिल मिळणेसुद्धा दुरापास्त आहे. असे असताना शालेय मुलींना उपस्थिती प्रोत्साहन देण्यासाठी दिला जाणारा तुटपुंजा भत्तादेखील वाढविण्याची गरज आहे.

आज सावित्रीबाईंची जयंती आपण उत्साहात साजरी करत आहोत, सावित्रीबाईंनी सामाजिक विरोध झुगारून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलींना ज्ञानदानाचे पवित्र काम करून स्त्रीशिक्षणाची दारे खुली केली. याच पार्श्वभूमीवर बालिका दिनाचे निमित्त साधून शासनाने उपरोक्त योजना सुरू केलेली आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

सध्याच्या आधुनिक युगात देश डिजिटायझेशनकडे वाटचाल करत असताना शिक्षण व त्याला पूरक साधनांमध्ये देखील आमूलाग्र बदल झाले आहेत. या बदलांना अनुसरून व आधुनिक शिक्षण पद्धतींचा अवलंब करून प्राथमिक शिक्षण प्राप्त करण्यासाठी उपरोक्त संदर्भीय योजनेचे पुनरावलोकन करून त्यात बदल करणे गरजेचे आहे. तसेच याअंतर्गत मुलींना दिला जाणारा दैनंदिन भत्ता १ रुपयांवरून प्रतिदिन किमान २० रुपये करणेदेखील गरजेचे आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने या योजनेचे पुनरावलोकन करून दैनंदिन भत्ता वाढ करण्यासाठी आपण आपलेस्तरावरून बैठकीचे तातडीने आयोजन करून निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी माजी समाजकल्याणमंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT