NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News: जितकी झाडे जगली तेवढेच पैसे..! पावसाळ्यानंतर महापालिकेची वृक्षारोपण मोहीम

सकाळ वृत्तसेवा

NMC News : महापालिका उद्यान विभागाकडून यंदा पावसाळा संपल्यानंतर वृक्षारोपण केले जाणार आहे. वास्तविक पावसाळ्यात वृक्षलागवडीचा कार्यक्रम होतो, परंतु असे असले तरी उद्यान विभागाने पारंपरिक पध्दत मोडीत काढून पावसाळ्यानंतर वृक्षलागवडीचा निर्णय घेतला.

वृक्षलागवड करताना संबंधित ठेकेदारावर तीन वर्षांसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली असून जितकी झाडे जगतील त्याच झाडांचे देयके अदा केली जाणार आहे.

साधारण साडेदहा हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी जवळपास दोन कोटी ३६ लाख ४२ हजार ३६६ रुपये खर्च केले जाणार आहे. (payment money per trees live After monsoons NMC tree plantation drive nashik)

महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण केले जाते. जेणेकरून वृक्षांना पाणी मिळून भुसभुसीत झालेल्या जमिनीत वृक्ष जीव धरून चांगल्या पद्धतीने वाढ होईल. परंतु किती झाडे जगली याचा हिशोब मात्र लागत नाही.

२०२३-२४ या वर्षात पावसाळा संपल्यानंतर वृक्षारोपण करण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला आहे. पावसाळ्यानंतर जमिनीत पाणी मुरलेले असते. त्यानंतर कडक ऊन पडते.

खड्डे केल्यानंतर उन्हामुळे शुद्धीकरण होते व पाण्यात ओलावादेखील राहतो. शुध्द मातीत झाडे जगण्याचे प्रमाण अधिक राहते. त्यामुळे पावसाळ्यानंतर उद्यान विभागाकडून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वृक्षारोपणाचे कंत्राट देताना तीन वर्षांसाठी देखभालीची जबाबदारीदेखील संबंधित ठेकेदारांकडे सोपविण्यात आली आहे.

वृक्षलागवड, संरक्षक जाळी, वृक्ष जगविण्याची जबाबदारी यासाठी एकूण दोन कोटी ३६ लाख ४२ हजार ३६६ रुपये खर्च केले जाणार आहे. महासभा व स्थायी समितीत मंगळवारी (ता. १०) प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

"पावसाळ्यानंतर वृक्षारोपण केले जात आहे. यामागे तंत्रज्ञान आहे, झाडे जगली पाहिजे. यासाठी तीन वर्षांसाठी ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे."

- विवेक भदाणे, उद्यान अधिक्षक, महापालिका.

असा आहे वृक्षारोपणाचा कार्यक्रम

विभाग वृक्षसंख्या खर्च

नाशिक रोड १००० २० लाख ७७ हजार ७१६

सातपूर २००० ३९ लाख ६३ हजार ६०९

पश्चिम १५०० ४२ लाख ३२ हजार १९३

पूर्व २००० ४१ लाख ५५ हजार ४३३

पंचवटी २००० ४० लाख ९५ हजार २१७

सिडको २००० ५१ लाख १८ हजार १९८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT