NMC esakal
नाशिक

नाशिक : मार्चच्या अखेरीस महापालिकेकडून कोटींची देयके अदा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सध्या महापालिकेत प्रशासकांची नेमणूक झालेली असली तरी गेल्‍या काही दिवसांपासून शहर परिसरात प्रस्‍तावित विकास कामे सुरू आहेत. नुकताच ३१ मार्चला संपलेल्‍या आर्थिक वर्षातील शेवटच्‍या महिन्‍यात महापालिकेतर्फे सुमारे २०३ कोटी रुपयांची देयके अदा केली आहेत. या महिन्‍यातील शंभर टक्‍के देयके लेखा विभागातर्फे आदा केली आहेत.

आर्थिक वर्षाच्‍या शेवटच्‍या महिन्‍यात लेखा विभागाकडे २०३ कोटी रुपयांची बिले दाखल करण्यात आली. मार्चअखेरच्‍या शेवटच्‍या दिवशी सुमारे पन्नास कोटी रुपयांची बिले सादर झाली होती. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी महापालिकेचे (NMC) दोन हजार ३६१ कोटी ५३ लाखांचे प्रारूप अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. यामध्ये स्‍थायी समितीने ४०५ कोटी २५ लाखांची वाढ दर्शविताना दोन हजार ७६३ कोटी ८१ लाख रुपयांच्‍या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती. महासभेने १२३ कोटी २३ लाखांची वाढ केल्‍याने अंदाजपत्रक दोन हजार ८८३ कोटी २१ लाखांपर्यंत पोचले होते. दरम्‍यान, कोरोना महामारीमुळे गेल्‍या दोन वर्षांपासून महापालिकेचे उत्‍पन्न प्रभावित झालेले होते. अशात महापालिकेकडे मर्यादित निधी उपलब्‍ध असताना दोनशे कोटींची बिले काढण्यासाठी ठेकेदारांची महापालिका मुख्यालयात गर्दी बघायला मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT