Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : गुन्हेगारीमुळे शहराची शांतता धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील वृध्द शेतकऱ्याच्या खुनाच्या घटनेने नाशिक पुन्हा हादरले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहर परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. मात्र यातील बहुतांशी गुन्ह्यांची उकल अद्यापही होऊ शकलेली नाही.

त्यामुळे गुन्हेगारांची मुजोरी वाढते आहे. भररस्त्यावर मारहाण, लूटमार, हत्यारांसह दहशत माजविण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. यातून शहराची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थंडावलेल्या ‘पोलिसिंग’ मुळेच रखडलेल्या गुन्ह्यांची यादी दिवसेंदिवस लांबत चालली आहे. सदर बाब शहराच्या शांततेसाठी धोकादायक आहे. (Peace of city is threatened by crimeLaw and order problem serious due to serious crimes Solving pending crimes Jalgaon Crime News)

शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये सातत्याने गुन्हेगारी घटना घडत आहेत. सोनसाखळी व दुचाकी चोरी, लूटमार, मारहाणीच्या घटना नित्याच्या झाल्या असून, गुन्हा दाखल होऊनही उकल पोलिसांकडून होताना दिसून येत नाही. गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे रेकॉर्डवरील गुन्हेगार खुलेआम हत्यारे बाळगून दहशत पसरविण्याचे काम करीत आहेत. तरुणांकडे गावठी कट्टे मिळून येत आहेत.

लहान वादाच्या घटनांमध्ये कोयत्यासारख्या हत्यारांचा सर्रास वापर होतो आहे. चौकाचौकात टवाळखोरांचे अड्डे तयार झाले आहेत. महिला, मुलींचे छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. याबाबत काही जागरूक नागरिक पोलिसांत तक्रारीसाठी जातात, परंतु त्यांची दखल घेतली जात नाही. तर, ज्या गुन्ह्यांची पोलिसात नोंद होत, त्यांचा तपास होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये गंभीर गुन्हेगारी घटना घडूनही गुन्ह्यांची उकल अद्यापही होऊ शकली नाही.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

सातपूरमध्ये भरदिवसा उद्योजकाच्या बंगल्यावर दरोडा, सिडकोतील पवननगर- उत्तमनगर परिसरात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर झालेला गोळीबार, ठक्कर बाजार बसस्थानक रस्त्यावर ३० किलो चांदीची लुट, अंबड चुंचाळे शिवारात परप्रांतीय युवकाचा चिरलेला गळा, होलाराम कॉलनीतून रिअल इस्टेट व्यावसायिकाची ६६ लाखांची लुट आणि आडगाव येथील एमएमआरडीए व उपनगर येथील लष्कराच्या प्रतिबंधित क्षेत्रात अज्ञात ड्रोनने घुसखोरी केली होती. या अत्यंत गंभीर गुन्ह्यांची अद्यापही उकल होऊ शकलेली नाही. गुन्हा नोंद होऊनही तपास होत नसल्याचे नेमके पोलिस करतात तरी काय, असा गंभीर प्रश्‍न नागरिकांसमोर उभा राहिला आहे.

रखडलेले गंभीर गुन्हे

* सातपूरला उद्योजकांच्या बंगल्यावर भरदिवसा पडलेला दरोडा

* सिडकोत राजकीय पदाधिकाऱ्यावर अज्ञातांकडून झालेला गोळीबार

* ठक्कर बझार रस्त्यावर तीस किलो चांदीची लूटमार

* नाशिक रोड हद्दीत उसाच्या शेतात आढळलेला तरुणीचा मृतदेह.

* अंबडच्या चुंचाळे शिवारात परप्रांतीयांची गळा चिरून केलेली हत्या

* सोनसाखळी, मोबाईल व दुचाकी चोरीच्या घटना

* प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोनची घुसखोरी

* बेपत्ता दिवे खून प्रकरण

* होलाराम कॉलनीत ६६ लाखांची लुट

"प्रलंबित गुन्ह्यांमध्ये संशयित निष्पन्न आहेत. काही गुन्ह्यात ते अटक नाहीत, तर काहींचा तपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विशेष पथके काम करीत असून, पाठपुरावा सुरू आहे."

- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT