Yashraj Borgude esakal
नाशिक

Nashik Accident News: नैताळे येथील ट्रक अपघातात पादचारी यशराज बोरगुडे ठार

सकाळ वृत्तसेवा

नैताळे : विंचूरहून नैताळेकडे जाणारा १६ टायर ट्रक (एमएच १५ एचएच ६६८७) हा नैताळेच्या पूर्वेला असलेल्या दत्तमंदिर येथे टायर फुटल्याने सोमवारी (ता. २०) सायंकाळी पाचच्या सुमारास पलटी झाला.

त्यावेळी रस्त्याने पायी निघालेला यशराज प्रकाश बोरगुडे (वय २०) हा तरुण ट्रकखाली सापडून जागी ठार झाला. अपघाताने नैताळेवर शोककळा पसरली. (Pedestrian Yashraj Borgude killed in truck accident in Naitale Nashik Accident News)

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नैताळेजवळ अपघातातील मृत तरुणाचा तपास रात्री आठपर्यंत लागला नव्हता. येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रकाश कारभारी बोरगुडे यांचा मुलगा यशराज अजून घरी आला नसल्याने व त्याचा भ्रमणध्वनी बंद येत असल्याने त्याचे आई-वडील काळजीत होते.

अशात अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कपड्याचे वर्णन पोलिसांकडून कळल्याने व तेच वर्णन यशराजचे असल्याने या अपघातात यशराजचा जागी मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यशराज हा नाशिकच्या मातोश्री पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेत होता.

निफाड पोलिसांनी रात्री उशिरा अपघाताचा गुन्हा दाखल केला. ट्रकचा चालक आणि क्लीनर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार खरात हे तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kankavli Politics : नीतेश राणेंविरोधात 'मविआ' कोणाला उतरविणार रिंगणात; उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम, 'ही' नावं चर्चेत

Latest Maharashtra News Updates : Canada Politics Live: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना त्यांच्याच लोकांनी घेरले

Chutney Store Tips: घरी बनवलेल्या चटण्या दिर्घकाळ राहतील चांगल्या, फक्त 'या' टिप्स करा फॉलो

Aadhaar Update : आधार कार्डवरील ही माहिती कधीच बदलू नका; अपडेट करताना घ्या काळजी,नाहीतर होईल पश्चाताप

Share Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स 100 अंकांनी वाढला, निफ्टी 24,500 च्या खाली

SCROLL FOR NEXT