Nashik: Leaders of the organization speaking in the Zilla Parishad meeting regarding the pending issue of retired teachers. Guardian Minister Dada Bhuse, Zilla Parishad Chief Executive Officer Ashima Mittal and officials were present. esakal
नाशिक

Nashik News : जिल्ह्यात 250 शिक्षकांचे निवृत्तिवेतन थकले; पालकमंत्र्यांसमोर केंद्रप्रमुख संघाची कैफियत

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेच्या २५० सेवानिवृत्त शिक्षक, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांचे निवृत्तिवेतन वर्षभरापासून रखडले आहे.

त्यांना प्रत्येक महिन्याला मिळणारी पेन्शनही आता दोन ते चार महिने मिळत नसल्याने त्यांची परवड होत असल्याची कैफियत महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाने रविवारी (ता.२५) पालकमंत्री दादा भुसे व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली.

पालकमंत्र्यांनी यावर तोडगा सुचवत शिक्षकांनी मंगळवारी शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी सोडवाव्यात, राज्य पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.(pension of 250 teachers in district has expired Regret of not getting pension on time Kendra Pramukh Union mood in front of Guardian Minister Nashik News)

पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत रविवारी जिल्हा परिषदेत शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव उपस्थित होते. केंद्रप्रमुख संघाचे जिल्हाध्यक्ष निंबा निकम व यशवंत गायकवाड यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मांडले.

निवृत्त शिक्षकांना थकीत उपदान रक्कम वितरित करण्यासाठी ११ कोटी रुपये प्राथमिक शिक्षण विभागास प्राप्त झाले. त्यांनी ११५७ शिक्षकांना ९० लाख रुपये दिले, तर सुरगाणा तालुक्यातील १५४ शिक्षकांना तब्बल ५० लाख रुपये वितरित केले. कुठल्या निकषांच्या आधारे हे वाटप झाले, असा प्रश्न निकम यांनी उपस्थित केला.

यावर लेखाधिकारी बच्छाव यांनी खुलासा केला. ते म्हणाले, निधी वितरणाचे नियोजन शिक्षण विभाग करते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वित्त विभाग फक्त हे पैसे वितरित करण्याचे काम करते. शिक्षकांना दरमहा मिळणारी पेन्शन वेळेत मिळत नसल्याची खंत शिक्षकांनी मांडली. प्रत्येक महिन्याला होणारे नियोजन योग्य प्रकारे होत नसल्याने ही दिरंगाई होत असल्याची खंत पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलून दाखविली.

प्रत्येक महिन्याला नियमितपणे तेच काम करायचे असताना इतका वेळ का जातो? असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पेन्शन वेळेत मिळाली पाहिजे, यादृष्टीने नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शिक्षक संघटनांतर्फे पालकमंत्री भुसेंचा सत्कार करण्यात आला.

सेवेत नसताना फरक कसा?

शिक्षकांना एकीकडे निवृत्तीनंतरही वर्षानुवर्षे फरकाची रक्कम मिळत नाही आणि दुसरीकडे १० ते १५ वर्षे सेवेत नसलेल्या शिक्षकांना फरकाची रक्कम कशी दिली जाते, असा प्रश्न उपस्थित करत पालकमंत्री भुसेंनी खासगी शिक्षण संस्थांच्या कारभाराकडे अंगुलीनिर्देश केला. पालकमंत्र्यांच्या या प्रश्नाला अधिकाऱ्यांनी अलगदपणे बगल देत शिक्षकांचे प्रश्न वेळीच सोडवू, असे उत्तर दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न

- वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्यापोटी ११५० शिक्षकांचे दोन कोटी दहा लाख थकीत

- अंशराशीकरण २०२ व्यक्तींचे २१ कोटी ३४ लाख थकीत

- उपदान योजनेच्या ११ कोटींच्या वाटपात सुरगाण्याला झुकते माप का?

- निवड श्रेणीच्या यादीत त्याच शिक्षकांचा समावेश कसा होतो?

- अप्रशिक्षित शिक्षकांना पेन्शन मिळाली पाहिजे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: केंद्र सरकारने दिली दिवाळी भेट! महागाई भत्ता वाढवून सरकारी कर्मचाऱ्यांना केले खूश; किती वाढणार पगार?

Hall Of Fame: ICC कडून मोठी घोषणा! डिविलियर्स, कूकसह एका भारतीय खेळाडूचाही होणार सन्मान

IND vs NZ 1st Test : बंगळुरूचा पाऊस टीम इंडियाचे WTC Final Scenario बिघडवतोय; रोहित शर्माचं टेंशन वाढवतोय

Latest Maharashtra News Updates : SCO कौन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटची इस्लामाबादमध्ये बैठक संपन्न

Hema Malini : मुंबईतील त्या बंगल्यात राहायला जाताच हेमामालिनी यांना आलेला विचित्र अनुभव ; ताबडतोब सोडलेलं राहतं घर

SCROLL FOR NEXT