sakal
नाशिक

Nashik News: प्रलंबित प्रश्‍नांचा आतातरी सोक्षमोक्ष लावा; नाशिककरांची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: : राज्य विधी मंडळाचे अधिवेशन गुरुवार (ता. ७) पासून सुरू होत असून अधिवेशनाच्या निमित्ताने नाशिकच्या प्रलंबित प्रश्‍नांना वाचा फुटून तत्परतेने सुटतील, अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे.

शहराशी संबंधित एक डझनहून अधिक प्रश्‍न प्रलंबित आहे. त्याशिवाय नाशिक- मुंबई प्रवासाला तब्बल पाच तास लागतं असल्याने नाशिककरांसाठी मोठी डोकेदुखी आहे.

त्यामुळे कल्याण ते ठाणे दरम्यानची वाहतुकीची समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित केला जाईल, अशी अपेक्षा नाशिककरांची आहे. (people are hoping that pending issues of Nashik will be resolved in Session of State Legislature news)

विशेष म्हणजे रस्ते मार्गाने मुंबईचा प्रवास म्हणजे सध्या दिव्य झाले आहे. त्याचा फटका खुद्द लोकप्रतिनिधींना बसत असल्याने रेल्वे मार्गाने प्रवास करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या प्रश्‍नाची तड अधिवेशनात लागेल, अशी अपेक्षा आहे. २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा पुरवाव्या लागतील. त्यामुळे राज्य शासनाने विकास आराखडा मंजूर करून निधी दिला पाहिजे. नाशिक- पुणे रेल्वे मार्गासह रस्ते मार्ग विस्तारीकरणासाठी भूसंपादनाला वेग आला पाहिजे.

आयटी व लॉजिस्टीक पार्कची घोषणा झाली, परंतु अंमलबजावणीसाठी कार्यवाही झाली नाही. हीच स्थिती फूड प्रोसेसिंग हब संदर्भात आहे. पुण्याबरोबरच मुंबई महामार्गाचे विस्तारीकरण, औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारासाठी सेझसाठी इंडिया बुल्सला दिलेल्या जमिनींचे हस्तांतर आवश्‍यक आहे.

नाशिकचा संबंध रामायणशी अधिक असल्याने केंद्र सरकारकडे रामायण सर्किटसाठी केंद्राकडे पाठपुरावा होणे आवश्‍यक आहे. वाराणसी येथील गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी आरती सुरू व्हावी अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर येथे वेलनेस सेंटरची घोषणा झाली परंतु अंमलबजावणी न झाल्याने प्रकल्प कागदावरच आहे.

राज्य सरकारशी संबंधित नाशिकचे प्रलंबित प्रश्‍न

- नाशिक-मुंबई महामार्गावर कल्याण फाटा ते ठाणे दरम्यान होणारी वाहतूक ठप्प.

- सिंहस्थ विकासासाठी समिती गठित करून निधी देणे.

- नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे भूसंपादन.

- आयटी व लॉजिस्टीक पार्क.

- मल्टी मोडल हब.

- मुंबई महामार्गाचे विस्तारीकरण.

- इंडिया बुल्स प्रकल्पाच्या जमिनींचे हस्तांतर.

- रामायण सर्किटसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा.

- गंगाआरतीच्या धर्तीवर गोदावरी आरती.

- फूड प्रोसेसिंग हब.

- औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन.

- इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर येथे वेलनेस सेंटर.

केंद्र सरकारशी संबंधित नाशिकचे प्रलंबित प्रकल्प

- टायरबेस मेट्रो निओ प्रकल्प.

- नमामि गोदा प्रकल्प.

- इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब.

- गोदावरी, नाशिक-पुणे ट्रेनचा लांबविलेला प्रवास.

- विमानसेवेचे विस्तारीकरण.

- दत्त मंदिर ते द्वारका डबलडेकर उड्डाणपूल.

- नाशिक-पुणे महामार्गाचे विस्तारीकरण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT