Nashik Leopard News : देवळाली मतदारसंघातील ग्रामीण भागात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे. अनेकांना बिबट्या दिसत असल्यामुळे देवळाली मतदारसंघात बिबट्याचा वावर असणाऱ्या ठिकाणी पिंजरे लावावे, अशी मागणी सध्या होत आहे.
दाढेगाव, विहीतगाव, रोकडोबावाडी देवळालीचा ग्रामीण परिसर, जयभवानी रोड येथे बिबट्याचे वेळोवेळी दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. (people everyday seeing leopard in Deolali Constituency nashik news)
विशेष करून डोबी मळा, रोकडोबावाडी, जयभवानी रोड बरोबरच सैन्यदलांच्या आसपासचा परिसरात नदीकिनारी सध्या बिबट्या सैरावैरा फिरत आहे. अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन लोकांना होत आहे. डोबी मळा येथे अनेक वेळा बिबट्या असतो.
येथील रहिवासी अगदी काळजीने मार्गक्रमण करीत असतात. सध्या जयभवानी रोड, डोबी मळा, जाचक मळा, रोकडोबावाडी, अण्णा गुरुजी मंदिराच्या आसपासचा परिसर सैन्यदलाची भिंत, वालदेवी नदी, दाढेगाव, विहीतगाव, पाथर्डी परिसरात सध्या बिबट्याचे मोठ्या प्रमाणावर दर्शन होत आहे.
पहाटे शौचालयाला जायला लोक घाबरत आहे. अनेक वेळा बिबट्या पिंजऱ्यात पकडला जातो आणि पुन्हा दुसऱ्या बिबट्या दर्शन देतो. याचे रहस्य तरी काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. रात्री फिरणे अवघड झाले असून पहाटे घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. वन विभागाने गंभीर पावले न उचलल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
"विशेष करून दाढेगाव, पिंपळगाव खांब, विहीतगाव, वडनेर परिसरात पिंजरा लावण्याची आवश्यकता आहे. बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही शेतात जाणे अवघड होत आहे. वनविभागाने वेळीच उपाययोजना करायला हव्यात नाहीतर शरद पवार गटाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल." - लक्ष्मण मंडाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
"वन विभागाने रात्री पेट्रोलिंग करायला हवे. बिबट्या झाडांमध्ये लपून बसतो. अनेक वेळा लोकांना दिसत नाही. फटाके फोडून बिबट्याला पळवावे लागते. रात्री लहान मुलांसह महिला, ज्येष्ठ नागरिक शतपावली करतात, त्यांना बिबट्याचे दर्शन होते. उपनगरपासून तर थेट जयभवानी रोड, रोकडोबावाडी, देवळाली गाव येथे भीतीचे वातावरण आहे." - चंदू साडे, सामाजिक कार्यकर्ते.
"देवळाली कॅम्पचा ग्रामीण भाग येथे बिबट्याची दहशत वाढत आहे. वन विभागाने किमान २५- ३० ठिकाणी पिंजरे लावणे अपेक्षित आहे. विशेष करून वडनेर, पिंपळगाव, देवळालीचा ग्रामीण परिसराबरोबरच विहीतगावच्या ग्रामीण परिसरात पिंजरे लावायला हवे. बिबटे मानवी वस्त्यांकडे फिरत आहे.''- सुरेश बोराडे, सामाजिक कार्यकर्ते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.