Nashik Leopard News : तालुक्यातील कुंदेवाडी येथील संगमेश्वर रस्त्यालगत असलेल्या माजी सरपंच रतन मधुकर नाठे यांच्या बंगल्याबाहेर रविवारी (ता. १०) सकाळी पावणे सहाच्या सुमारास पाळीव कुत्र्याचा बिबट्याने फडशा पडला.
कुंदेवाडी परिसरात दिवसेंदिवस बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. (Pet dog mauled by leopard Kundewadi incident nashik)
कुंदेवाडी येथील माजी सरपंच रतन मधुकर नाठे यांच्या घराची राखण करणाऱ्या बंगल्याच्या आवारात बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. कुत्रा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न करीत होता.
बिबट्यापुढे त्याचे प्रयत्न अपूर्ण पडले. चैनने बांधलेल्या कुत्र्याला बिबट्याला ओढून नेता न आल्यामुळे बिबट्याने आवारामधून धूम ठोकली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना भीती वाटत आहे.
नाठे कुटुंबीयांचा कुत्रा सुमारे आठ वर्षांपासून त्यांच्या घराची राखण तो करीत होता. त्याच्या जाण्याने नाठे कुटुंबातील सदस्य हळहळ व्यक्त करीत होते.
जॅक पाळीव कुत्र्याचा रतन नाठे, सोमनाथ नाठे व नातेवाइकांनी अंत्यविधी शेतात केला. या वेळी सर्व कुटुंबांना अश्रू अनावर झाले होते. दिवसभर कुंदेवाडीचे पाळीव कुत्र्याबाबत घरी येऊन विचारपूस करीत होते. हा पाळीव कुत्रा रात्री आपल्या भुंकण्याने सावध करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जेरबंद करण्याची मागणी
परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. शेतात काम करताना बिबट्या हल्ला करू शकतो, अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. यापूर्वी नायगाव दोडी भागातील शेतकरी दांपत्यावर बिबट्याने हल्ला केला होते.
त्यानंतर नायगाव येथे एका दिवशी चार व्यक्तींवर हल्ला करत बिबट्याने जखमी केले होते. कुंदेवाडी परिसरात वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.