Police taking the suspect arrested by the ATS from Malegaon to the court esakal
नाशिक

PFI Case : मालेगावातील मौलानास ATSकडून अटक; Social Mediaवर चिथावणीखोर संदेश

सकाळ वृत्तसेवा

नाशिक-मालेगाव : देशविघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या सातव्या संशयिताला नाशिक दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) मालेगावातून अटक केली. मालेगाव येथील जामा मशिदीच्या मौलाना इरफान दौलत खान नदवी (वय ३५, रा. गुलशेरनगर, मालेगाव) यास एटीएसने रविवारी (ता. १३) अटक केली. त्यास सोमवारी (ता. १४) नाशिक येथील विशेष न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

काही आठवड्यांपासून मौलाना नदवी याच्या हालचालीवर एटीएसची नजर होती. दरम्यान, पीएफआयशी संबंधित मालेगावातून अटक करण्यात आलेला हा दुसरा संशयित आहे. २२ सप्टेंबरला पीएफआयचा जिल्हाध्यक्ष मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी (वय २६, मालेगाव, जि. नाशिक) यास एटीएसने अटक केलेली आहे. (PFI Case Maulana of Malegaon jama masjid arrested by ATS Provocative messages on Social Media Nashik new)

मौलाना इरफान दौलत खान नदवी (वय ३५, रा. गुलशेरनगर, मालेगाव) यास नाशिक एटीएसच्या पथकाने रविवारी (ता. १३) अटक केली. मौलान नदवी हा पीएफआयचा २०१९ पासून सक्रिय सदस्य आहे. या संघटनेचा तो माजी जिल्हाध्यक्ष असून, सध्या या संघटनेचा मालेगाव समन्वयक आहे. २०२१ पासून तो ऑल इंडिया इमाम कौन्सिल या संघटनेचा राज्य अध्यक्षही आहे. मौलाना नदवी याच्या प्राथमिक चौकशीदरम्यान त्याने अनेक बाबी दडविल्याने एटीएसने त्यास अटक केल्याचे सरकारी पक्षातर्फे विशेष न्यायालयात सांगण्यात आले.

सरकार पक्षाची बाजू

नदवीने काही ग्रुपच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला असुरक्षितता निर्माण होईल, असे चिथावणीखोर संदेश व्हायरल केले होते. संशयास्पद अशा सांकेतिक शब्दांचा वापर करीत त्याचे काही वक्तव्यही तपासात एटीएसच्या हाती लागले आहेत. त्याच्या या कृत्यामुळे समाजात सशस्त्र जातीय संघर्षाला खतपाणी घालून हिंसक कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा ठपकाही मौलाना नदवी याच्यावर ठेवण्यात आला आहे.

त्यासंदर्भातील गोपनीय माहिती न्यायालयास देण्यात आली आहे. त्याच्याकडील मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह रेकॉर्डिंग्स‌ही एटीएसच्या हाती लागल्या असून, त्यातील आवाजाचे नमुने तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयास सांगितले.

बचाव पक्षाची बाजू

बचाव पक्षातर्फे ॲड. ए. एन. खान यांनी बाजू मांडताना, मौलाना नदवी हा पहिल्यापासून तपासाकामी सहकार्य करतो आहे. दोन दिवसांपूर्वी एटीएसने ताब्यात घेऊनही त्यास आज न्यायालयात हजर करणे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयास सांगितले. त्याचप्रमाणे सरकारी पक्षाकडे अजूनही मौलानाविरोधात कोणताही ठोस पुरावा मिळालेला नसताना त्यास अटक करणे गैर असल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद संपल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती ए. यू. कदम यांनी मौलाना नदवी यास येत्या २८ तारखेपर्यंत १४ दिवसांची कोठडी सुनावली.

चिथावणीखोर आंदोलने

संशयित मौलाना इरफान नदवी भाजपच्या नूपुर शर्मा प्रकरणानंतर औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड या ठिकाणी आंदोलनांमध्ये सहभागी झाला होता. त्या वेळी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘गुस्त के नबी की एक ही सजा, सर तन से जुदा’, असा उर्दू भाषेतून चिथावणीखोर संदेश व्हायरल केला होता. काही संभाषणांमध्ये त्याने सांकेतिक भाषांचा वापर केला असून, त्याचा तपास करण्यासाठी एटीएसने न्यायालयाकडे पोलिस कोठडीची मागणी केली.

अटकेतील संशयितांशी संवाद

पीएफआयच्या ज्या पाच सदस्यांना नाशिक एटीएसने अटक केली आहे त्यांच्या सतत संपर्कात मौलाना नदवी होता. त्यांच्यात सुमारे ५५० संवाद झालेले आहेत. राज्यभरातून अटक करण्यात आलेल्या पीएफआयच्या संशयितांच्याही संपर्कात मौलाना नदवी होता. त्यांच्याशीही त्याचे ६५० संवाद झाल्याचे एटीएसच्या तपासातून समोर आले आहे. मौलानाचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आलेला आहे. तसेच टेरर फंडिंगचाही संशय सरकारी पक्षातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

आजपर्यत अटकेतील संशयित

मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी (वय २६, मालेगाव, जि. नाशिक), अब्दुल कय्यूम बादुल्ला शेख (४८, रा. कोंढवा, पुणे), रझी अहमद खान (३१, रा. कोंढवा, पुणे), वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख (२९, रा. बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. कोल्हापूर), उनैस उमर खय्याम पटेल (वय ३२, रा. जळगाव).

देशविघातक कारवाया, टेरर फंडिंगशी संशय

मालेगाव : देशविघातक कारवाया, टेरर फंडिंग केल्याच्या संशयावरून एटीएसने अटक केलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) प्रमुख कार्यकर्ता मोहंमद इरफान दौलत खान ऊर्फ मौलाना इरफान खान नदवी याची एटीएसने आधी संशयावरून चौकशी केली होती. चौकशीनंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले होते. या काळात त्याने पत्रकार परिषद घेत संघटनेवरील बंदीचा विरोध केला होता.

संघटनेच्या अन्य काही कार्यकर्त्यांना शहरासह जिल्ह्यातून अटक झाल्यानंतर संशयितांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार टेरर फंडिंग प्रकरणात मौलाना इरफानचा नजीकचा संबंध असल्याचे समजते. मौलाना इरफान त्याचे आप्तस्वकीय व मित्रांच्या खात्यावर काही निधी आल्याचे समजते. या निधीचा देशविरोधी कारवायांसाठी दुरुपयोग करण्यात येत होता. मौलाना इरफानच्या अटकेनंतर सोमवारी रात्री दहशतवादविरोधी पथकाने त्याच्या घराची झडती घेतली.

झडतीत महत्त्वाची कागदपत्रे, प्रचार साहित्य व आर्थिक व्यवहारासंदर्भातील माहिती असलेले दस्ताऐवज जप्त केल्याचे समजते. पीएफआयशी संबंधित येथील हुडको कॉलनी भागातील पीएफआयचा प्रमुख मौलाना सैफुर रहेमान अन्सारी हा यापूर्वीच अटकेत आहे. सैफुर रहेमानच्या अटकेनंतर तातडीने मौलाना इरफान खानला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT