PFI official Maulana Saifur Rehman in custody of ATS esakal
नाशिक

Breaking News | PFI पदाधिकारी मौलाना सैफुर रहमान ATS च्या ताब्यात

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरासह राज्यात पीएफआय च्या गतीविधी व आंदोलन संशयास्पद असल्याने गुरूवारी (ता. २२) पहाटे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयएने) छापेमारी केली. या कारवाईत येथील पीएफआय चा प्रमुख मौलाना सैफुर रहेमान याला ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. ( PFI official Maulana Saifur Rehman in custody of ATS Nashik Breaking News)

राज्यात आज पहाटे एनआयएच्या पथकाने अनेक ठिकाणी मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्ते व कार्यालयांवर छापेमारी केली. यात पीएफआय शी संबंधित सैफुर रहेमान याला ताब्यात घेतांनाच काही कागदपत्रे व प्रचार पत्रकांची तपासणी व चौकशी करण्यात आल्याचे समजते. संघटनेच्या एका सदस्याला ताब्यात घेतल्याचे वृत्ताला येथील अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी ' सकाळ' शी बोलताना दुजोरा दिला.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेकडून अनेक संशयास्पद घटनांचा धोका असल्याचा इशारा यंत्रणांना गुप्तवार्ता विभागाने दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं समजते. या वादग्रस्त संघटनेची देशभरात तीन लाख वैयक्तिक व कौटुंबिक (फॅमिली) अकाऊंट आहेत. या खात्यांमध्ये विविध कामांचे नावाने कतार , कुवैत , बहरीन आणि सौदी अरेबियातून कोट्यवधी रुपये येत असल्याची माहिती आहे. ईडी व अन्य यंत्रणा याबाबत चौकशी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सहलीसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, आई-वडिलांसह मुलगा-मुलगी अपघातात जागीच ठार; गाय आडवी आली अन्..

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Donald Trump : रशिया-युक्रेन युद्ध थांबवू... डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही; मृतांबद्दल दुःख व्यक्त

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ‘काम करणारा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा झाली यशस्वी

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT