Left bank canal plight due to garbage in Panchavati  esakal
नाशिक

डाव्या कालव्यात कचरा पडतो सर्रास; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : शहर परिसरात कचऱ्याची समस्या गंभीर होत असल्याचे रस्त्यांच्या कडेला टाकण्यात येत असलेल्या कचऱ्याच्या ढिगावरून दिसत आहे. झोपडपट्टीच्या भागात तर ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसते.

फुलेनगरच्या भागातील कचरा थेट गंगापूर धरणाच्या डाव्या तट कालव्यात टाकण्याचे प्रकार थांबत नाहीत. त्यामुळे फुलेनगर झोपडपट्टीच्या भागात पेठ रोड ते दिंडोरी रोड दरम्यानच्या कालव्याच्या भागात साचलेले पाणी आणि तरंगणारा कचऱ्यामुळे घाणीचे आणि दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. (phulenagar Garbage in left canal health of citizens is at risk Latest marathi)

पंचवटी परिसरातून वाहत जाणारा हा कालवा मखमलाबाद शिवारातून पेठ रोड, दिंडोरी रोड, वज्रेश्वरी झोपडपट्टी, हिरावाडी, विजय नगर कॉलनी, निलगिरी बाग, नांदूर व मानूर या महापालिकेच्या हद्दीतून जातो.

त्यात फुलेनगर, वज्रेश्वरी व निलगिरी बाग या तीन झोपडपट्ट्यांच्या भागातून हा कालवा जातो. या झोपडपट्टीच्या भागांसह हिरावाडी या लोकवस्तीच्या भागात कालव्यात कचरा फेकण्यात येत आहे. त्यामुळे या भागात हा कालवा नसून कचराकुंडीसाठी हक्काची जागाच असल्याची जाणवते.

कालव्यात साचून राहणारा कचरा व गाळ काढण्याचे काम पाटबंधारे खात्याकडून दरवर्षी केले जाते. हा कचरा जेसीबीच्या साहाय्याने काढून तो याच परिसराच्या भागात टाकण्यात येत असल्याने त्याचे कालव्याच्या किनाऱ्यावर ढीग पडलेले दिसतात. कालव्याच्या दोन्ही बाजूला झोपड्या उभारण्यात आलेल्या आहेत.

त्यामुळे या भागात कालव्याचा रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे. विशेष म्हणजे, त्याच भागातून कचरा फेकण्याचे प्रकारही रोज होत आहेत. याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. फुलेनगर झोपडपट्टीजवळ असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून जाणारी जलवाहिनीही या भागातून मेरी परिसराकडे जाते.

कालव्यावरून जाणारी ही जलवाहिनी फोडून त्यातून पाणी पिण्यासाठी तसेच भांडी धुणे व कपडे धुण्यासाठी वापरण्यात येते. त्यामुळे कालव्याच्या पेठ रोड ते दिंडोरी या भागात कायम पाणी साचलेले आहे. तसेच गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या साचलेल्या पाण्यात या परिसरातील कचरा सर्रास फेकण्यात येत आहे.

त्यातील बहुतांश कचरा सडून त्याची दुर्गंधी पसरते. प्लॅस्टिक व थर्मोकॉलचा कचरा पाण्यावर तरंगतो. कालव्याला आवर्तन सुटल्यानंतर हा कचरा वाहून पुढे शेतात जातो. त्यामुळे शेतात गेल्या काही वर्षांपासून पाण्यासोबत वाहून आलेल्या प्लॅस्टिकच्या कचऱ्याची समस्या वाढत आहे.

विविध आजारांना आमंत्रण

गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या कालव्यात होणारी कचराफेक व साचलेले पाणी यामुळे दुर्गंधी निर्माण होते. हे स्थळ डास उत्पत्तीचे केंद्र बनले आहे. यामुळे विविध आजारांना आमंत्रणदेखील दिले जात आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT