Two suspects arrested with beef and pickup. Along with the team of Unit One of the City Crime Branch esakal
नाशिक

Nashik Crime : गोवंशाची वाहतूक करताना पिकअप जप्त; दोघांना अटक

इंदिरानगर परिसरातील खोडेनगरमध्ये ५०० किलो गोवंशा मांस विक्रीसाठी आणले असता, शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इंदिरानगर परिसरातील खोडेनगरमध्ये ५०० किलो गोवंशा मांस विक्रीसाठी आणले असता, शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली.

पिकअपसह गोवंशाचे मास असा ८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. (Pickup seized while transporting cattle Both arrested Nashik Crime)

अमीर असद कुरेशी (२७, रा. संगमनेर, जि. नगर), सलमान इकबाल कुरेशी (२८, रा. चौक मंडई, भद्रकाली) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार मुक्तार शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर येथून पिकअपमध्ये मोठ्याप्रमाणात गोवंशाचे मांस विक्रीसाठी नाशिकमधील खोडेनगर येथे आणण्यात येणार होते.

सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना माहिती दिली असता, त्यांच्या मार्गदर्शनाखाली खोडेनगर परिसरात पहाटेला सापळा रचण्यात आला.

गोवंशाचे मांस घेऊन पिकअप आला असता दबा धरून असलेल्या युनिट एकच्या पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली. यावेळी पिकअपमध्ये ५०० किलो गोवंशाचे मांस आणण्यात आले होते.

ते संशयित अमीर कुरेशी याच्याकडून संशयित सलमान कुरेशी खरेदी करून मुंबई नाका, भद्रकाली, वडाळानाका याठिकाणी त्याची किरकोळ विक्री केली जाणार होती. पिकअप (एमएच १४ डीएम ३००६) व गोवंश मांस असा ८ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यता आला आहे.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ.सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, मिलिंदसिंग परदेशी, मुक्तार शेख, अप्पा पानवळ, राजेश राठोड, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, किरण शिरसाठ यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT