Frames made by Mahendra Suryabhan Pangarkar based on the ideas of Thomas Alva Edison and the Wright Brothers. esakal
नाशिक

Nashik News: ते अनोख्या पद्धतीने पसरवताहेत शास्त्रज्ञांच्या विचारांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती!

आनंद बोरा

नाशिक : शिंदे येथील महेंद्र सूर्यभान पांगारकर यांनी शास्त्रांचे विचारांबद्दल चित्रांच्या फ्रेम्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

सापेक्षतेचा सिद्धांत मांडणारे अल्बर्ट आइन्स्टाईन, दूरध्वनीचा शोध लावणारे ग्रॅहॅम बेल, टेलिव्हिजनचे जनक जॉन लॉगीं बेअर्ड, उत्क्रांतिवादाचा क्रांतिकारी सिद्धांत मांडणारे डार्विन, रेडिओचे निर्माते मार्कोनी, वाफेचे इंजिन बनवणारे जेम्स वेट, वनस्पती शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस, गणितज्ज्ञ रामानुजन यांच्या फ्रेम्स बनवल्या आहेत. (Pictures about thoughts of scientists Awareness among students with help of frames by mahendra pangarkar nashik news)

चित्रकार विनोद मोरे यांनी श्री. पांगरकर यांना मदत केली आहे. थॉमस अल्वा एडिसन यांच्या फ्रेम्समध्ये ‘प्रत्येकाच्या आतमध्ये एक प्रकाश असतो, जो जग उजळू शकतो’, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा ‘तुम्ही पंख घेऊन आलेले आहात.

त्यांचा उपयोग करा, उंच भरारी घ्यायला शिका’, राईट ब्रदर्स यांचा ‘उंच भरारी घेण्यासाठी मशिनची नव्हे तर ज्ञान व कौशल्याची गरज असते !’ असा संदेश देतात. दरम्यान, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन परिणामाचा शोध लावला.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

यासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. तेव्हापासून देशात ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची ‘वैश्विक निरामयतेसाठी वैश्विक विज्ञान’ ही संकल्पना आहे.

"एका फर्निचर कंपनीमध्ये काम करताना स्वतःचा व्यवसाय सुरु केला. मी तयार केलेल्या खुर्चीच्या उत्पादनास पेटंट मिळाले. ग्रामीण युवक अनेक प्रयोग करतात. पण त्यांना पुढे काय करायचे हे माहिती नसते. त्यासाठी पेटंट संबंधीचे माहिती देण्याचे काम मी करत आहे. आता शाळांमधून ‘फ्रेम’द्वारे शास्त्रज्ञांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे."

- महेंद्र पांगारकर, शिंदे-पळसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मध्ये कोट्यवधींचा घोटाळा, RTIकडून खुलासा, ट्विट करत काँग्रेस नेत्याचे महायुतीवर टीकास्त्र

Shri Thanedar: ट्रम्प लाट असूनही मराठमोळ्या नेत्याने उधळला विजयाचा गुलाल! दुसऱ्यांदा बनले अमेरिकेचे खासदार, कोण आहेत श्री ठाणेदार ?

"तो सेटवर खूप..." अक्षय कुमारच्या सहकलाकाराचा खळबळजनक खुलासा ; "त्याच्या दोन-तीन गर्लफ्रेंड्स..."

USA Election 2024: राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! सोशल मीडियावर मिम्सचाही पाऊस

Latest Marathi News Updates live: महाविकास आघाडीच्या सभेत जयस्तुते गाण्याच सादरीकरण

SCROLL FOR NEXT