Onion Export Ban: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीच्या घोषणेनंतर पिंपळगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत कांद्याचे लिलाव शुक्रवारी (ता. ८) बंद पाडले होते.
सभापती, आमदार दिलीप बनकर यांनी शेतकरी व व्यापारी यांच्यात शनिवारी (ता. ९) समन्वय घडवून आणला. (Pimpalgaon onion auction resumed price dropped by 1500 nashik news)
व्यापाऱ्यांनी योग्य दराने भाव पुकारावेत, निर्यातबंदीच्या आडून भाव पाडू नये, बाजारभावात समाधान न झाल्यास शेतकऱ्यांना कांदा घेऊन जाण्याची मुभा असेल, असा तोडगा काढला. त्यानंतर पिंपळगाव बाजार समितीत ठप्प असलेले कांदा लिलाव सकाळी सुरू झाले.
लिलाव सुरू होताच लाल कांद्याचे दर तब्बल दोन दिवस अगोदरच्या तुलनेत दीड हजार रुपयाने कोसळले. २५० क्विंटल कांद्याचे लिलाव झाले.
लाल कांद्याला किमान १५००, कमाल ३२२५, तर सरासरी २५०० रुपये दर मिळाले.
शनिवारची आवक व बाजारभाव पाहता शेतकऱ्यांना चार लाख रुपयांची झळ पोहोचली. बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. पण, लाल कांद्याची साठवणूक करू शकत नसल्याने शेतकऱ्यांना नाइलाजाने आहे तो भाव स्वीकारावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.