Nashik News esakal
नाशिक

Nashik News: नाशिक शहरात धावणार पिंक रिक्षा; या तारखेपासून नाशिककरांच्या सेवेत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील रस्त्यांवर आता पिंक रिक्षा धावणार आहेत. नाशिक रोटरी क्लबतर्फे दोन गरजू महिलांना पिंक रिक्षांचे वितरण करण्यात आल्याने महिला सक्षमीकरणाला बळकटी मिळणार आहे. १ एप्रिलपासून या पिंक रिक्षा सेवेत दाखल होणार आहेत. रोटरी क्लबने महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

रोटरी क्लबचा ७८ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा झाला. हे औचित्य साधत रोटरीचे प्रांतपाल डॉ. आनंद झुंजूनूवाला यांच्या हस्ते नीता बागूल आणि शोभा पवार या दोन गरजू महिलांना पिंक रिक्षा वितरित करण्यात आल्या. या वेळी रोटरीचे अध्यक्ष प्रफुल्ल बरडीया, सचिव ओमप्रकाश रावत आदी उपस्थित होते.

पिंक रिक्षा प्रकल्पासाठी रोटरीचे खजिनदार संदीप खंडेलवाल यांचे सहकार्य लाभले. पिंक रिक्षा समिती सदस्य सतीश मंडोरा, ॲड. ताथेड, वैशाली रावत, तेजल शाह यांनी महिलांची निवड केली. हा नाशिकमधील शुभारंभाचा प्रकल्प असून पिंक रिक्षाची सेवा १ एप्रिलपासून नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

महिलांसाठी महिला चालकांनी चालविलेली रिक्षा नाशिककरांना प्रथमच पाहायला मिळणार आहे. याप्रसंगी मान्यवरांनी महिला रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. रोटरीच्या स्थापना दिवस समारंभात मुख्य अतिथी प्रांतपाल डॉ. आनंद झुंजूनूवाला यांनी रोटरीच्या विविध सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला.

रोटरी फाउंडेशनतर्फे जगभरात चालविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांविषयी माहिती दिली. तसेच पिंक रिक्षाचा उपक्रमास नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली.

अध्यक्ष बरडिया यांनी उज्ज्वल दृष्टी अभियानाविषयी माहिती दिली. या अभियानाअंतर्गत सहा हजार विद्यार्थ्यांना मोफत डोळे तपासणी आणि चष्म्यांचे वितरण करण्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान स्थापना दिवसाचा केक कापून रोटरी सभासदांच्या सुमधुर संगीतसंध्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

याप्रसंगी माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, नवनिर्वाचित प्रांतपाल आशा वेणुगोपाल, नाना शेवाळे असिस्टंट गव्हर्नर डॉ. अरुण स्वादी, सलीम बटाडा, माजी अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर आदी उपस्थित होते. सचिव ओमप्रकाश रावत यांनी आभार मानले. कार्यक्रम समन्वयक शिल्पा पारख, वंदना सम्मनवार, हेतल गाला, सुचेता महादेवकर यांनी कार्यक्रम आयोजनासाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT