सिन्नर (जि. नाशिक) : दिवाळीनंतर अर्थात तुळसी विवाहानंतर जी मंगलमय सुरवात होते ती म्हणजे लग्नसराई. मागील काही वर्षांत महामारीमुळे अर्थात कोरोनामुळे विवाह हे मोजक्याच लोकांमध्ये होत होते. आता सर्व विघ्न दूर झाल्यानंतर लग्नसराईला खऱ्या अर्थाने सुरवात झाल्याचे दिसून येते.
मुला-मुलींच्या लग्नासाठी नागरिक आता कार्यालय, लग्नासाठी लागणारे साहित्य अशा गोष्टींमध्ये वार्तालाप करताना अनेक ठिकाणी दिसत आहेत. पंचांग शास्त्राप्रमाणे यंदा २५ नोव्हेंबर ते पुढील वर्षी २८ जूनपर्यंत एकूण ५८ विवाह मुहूर्त आहेत. सर्वाधिक १४ मुहूर्त मे महिन्यात असून, गुरूच्या अस्तामुळे एप्रिलमध्ये मुहूर्त नाही. त्यामुळे यंदा कडाक्याच्या उन्हातच सनई-चौघडे वाजणार आहेत. (Planning begins at home wedding season starts from November 26 Nashik News)
२६ नोव्हेंबरपासून लग्नाचा धूमधडाका
तुळसी विवाहानंतर २६ नोव्हेंबरपासून लग्नाचा धूमधडाका सुरू होणार तो जूनअखेरपर्यंत तो सुरू राहणार आहे. या कालावधीत विवाहाचे ५८ मुहूर्त असून, विवाह असणाऱ्या घरांत या कार्यासाठी लगबग व नियोजन सुरू झाले आहे. लग्नासाठी लागणारे फर्निचर, भांडे, कपडे आदी साहित्य घेण्यासाठी आत्ताच दुकानांमध्ये येण्या-जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे
सोयीनुसार मुहूर्त
आतापासून मंगल कार्यालय, केटरर्स डेकोरेशन बुकिंग करत आहेत. सध्या मुला-मुलींची सोयरिक जुळविण्यासाठी पालक व नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. ज्याचे विवाह ठरले आहेत ते अलीकडेच विवाह सोहळ्याच्या तयारीत गुंतले आहेत. या वर्षीही एप्रिलचा गुरूचा अस्त आहे यामुळे एप्रिलमध्ये विवाह होणार नाहीत.
यंदा २८ जूनपर्यंत विवाहाचे मुहूर्त आहेत. यंदा मेमध्ये सर्वाधिक १४, तर नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक कमी चार मुहूर्त आहेत. वेगवेगळ्या पंचांगानुसार लग्नमुहूर्त आहेत. ऐनवेळी मंगल कार्यालय मिळत नसल्याने अनेकजण कार्यालय बुक करत आहेत. यंदा नोव्हेंबरमध्ये चार, डिसेंबरमध्ये आठ, जानेवारीत चार, फेब्रुवारीत ११, मार्चमध्ये पाच, मेमध्ये १४ व जूनमध्ये १६ विवाह मुहूर्त आहेत. या वर्षी लग्नाचे एकूण ५८ मुहूर्त आहेत. नोव्हेंबर ते जून या कालावधीत ५८ विवाह मुहूर्त आहेत. एप्रिलमध्ये गुरूचा अस्त असल्यामुळे विवाह तारखा नाहीत.
अशा आहेत लग्नतारखा
नोव्हेंबर : २६, २७, २८, २९
डिसेंबर : २, ४, ८, ९, १४, १६, १७, १८
जानेवारी : १८, २६, २७, ३१
फेब्रुवारी : ६, ७, १०, ११, १४, १६, २२, २३, २४, २७, २८
मार्च : ८, ९, १३, १७, १८
एप्रिलमध्ये मुहूर्त नाही!
मे : २, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३०
जून ः १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २३, २६, २७, २८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.