Nashik News : त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात २४ ऑक्टोबरला विजयादशमीला श्रीलंकेतील अनुराधापुरा येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे.
या महोत्सवास देश-विदेशातून व जिल्ह्यांतून महत्त्वाच्या व्यक्ती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
त्या दृष्टीने त्यांची सुरक्षितता व आनुषंगिक सोयी-सुविधांचे काटेकोर नियोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या. (Planting of Bodhi tree branch on 24th October in Buddha memorial area in phalke smarak nashik news)
जिल्हाधिकारी कार्यालयात बोधीवृक्ष रोपण महोत्सव समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, बोधीवृक्ष महोत्सवास दिवसभरात लाखोंच्या संख्येत नागरिकांच्या गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवावा. कार्यक्रमाच्या प्रवेशाचा व बाहेर पडण्याचा मार्ग यांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच सीसीटीव्ही, प्रवेश ठिकाणी तपासणी कक्ष, कंट्रोल रूम आदी सज्ज ठेवावे.
कार्यक्रमाचे ठिकाण हे नाशिक-मुंबई महामार्गालगत असल्याने या महामार्गावर गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही त्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. कार्यक्रमाच्या दिवशी महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वाहन, निवास व भोजन व्यवस्थेचे सूत्रबद्ध नियोजन करावे. तसेच त्यांच्यासाठी सेफ हाऊस व्यवस्था चोख ठेवावी.
तसेच देश- विदेशातून येणारे भिक्खू यांच्याही भोजन व निवास व्यवस्था समिती सदस्यांशी चर्चा करून आवश्यकतेनुसार करण्यात यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी दिवसभर नागरिकांना पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट, वाहतूक व्यवस्था, रुग्णवाहिका यांच्यासह आनुषंगिक सेवा-सुविधा पुरविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.