PM Narendra Modi esakal
नाशिक

PM Modi Nashik Visit: पंतप्रधान मोदी रामतीर्थ अन श्री काळाराम मंदिरात करणार पूजा, महाआरती

नाशिक मध्ये शुक्रवारी होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : नाशिक मध्ये शुक्रवारी होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येणार आहेत. त्यांच्या नाशिकच्या या दौऱ्यातील कार्यक्रमांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

नाशिकमध्ये ते आल्यानंतर छत्रपती संभाजी नगर रोडवर रोडशो करून पंचवटीत दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीची रामतीर्थ येथे पूजा व महाआरती करणार आहेत. त्यानंतर श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन आणि पूजा करून महाआरती करणार आहे.

मोदींच्या या वाढलेल्या दौऱ्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे. यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढण्यात आला आहे.

तसेच, गोदाघाटासह परिसरातील अतिक्रमण काढून परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी भिंतीचित्रे काढण्याचे काम युद्ध पथाळीवर सुरु झाले आहे. (PM Modi Nashik Visit will perform pooja Maha Aarti at Ramtirtha Shri Kalaram temple nashik)

निलगिरी बाग परिसरात त्यांचे हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणाहून त्यांचा तपोवनापर्यंत रोडशो होणार आहे.

त्यानंतर ते थेट रामकुंड येथे येणार असून रामकुंड येथे गोदावरी नदीची पूजा करून गोदावरीची महाआरती करणार आहे. तसेच, यानंतर प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊन पूजा करून आरती करणार आहे.

याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बुधवारी (ता. १०) रोजी सकाळी पंचवटी पोलीस ठाण्यात येऊन उपायुक्त किरणकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, राजू पाचोरकर, विजय ढमाळ, रणजित नलवडे यांच्यासह सर्व युनिटचे अधिकारी, स्कॉडचे अधिकारी यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांसह बैठक घेत सुरक्षा आणि बंदोबस्ताचा आढावा घेतला.

चोख बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. बाहेर गावावरून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था मंगल कार्यालय, मनपाचे हॉल याठिकाणी करण्यात येत आहे.

निलगिरी बाग येथील हेलिपॅडच्या ठिकाणावरून ते छत्रपती संभाजी नगर रोडने रोडशो करीत कैलास नगर चौक, संत जनार्दन स्वामी चौक, तपोवन कॉर्नर, नवीन आडगाव नाका येथून उडान पुलाखालून चौफुली, जुना एसटी डेपो समोरून जुना आडगाव नाका, निमानी, पंचवटी करांच्या मालेगाव स्टॅन्ड येथून रामकुंड येथे येणार आहे.

रामकुंडावर त्यांच्या हस्ते गोदामातेचे पूजा व महाआरती होणार आहे. त्यानंतर ते गंगाघाट मार्गाने काळाराम मंदिराकडे जाणार आहेत.

काळाराम मंदिर येथे प्रभू श्रीराम माता व लक्ष्मण यांच्या मूर्तीचे पूजा करून या ठिकाणी महाआरती होणार आहे या कार्यक्रमानंतर ते तपोवन साधूग्राम मैदानावर राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT