Nashik Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १२ तारखेला राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने नाशिक दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात मोदी यांचा ‘रोड-शो’ होण्याची शक्यता आहे.
परंतु, पंतप्रधान यांच्यासाठी असलेल्या खास सुरक्षापथक ‘एसपीजी’ (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) च्या पाहणीनंतरच पंतप्रधान मोदी यांच्या रोड-शोवर शिक्कामोर्तब होणार आहे. (pm modi Road show of only after SPG inspection in nashik news)
एसपीजीचे पथक येत्या मंगळवारी (ता.९) नाशिकला येणार असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १२ तारखेला तपोवनातील साधुग्राममध्ये होणार्या राष्ट्रीय युवा महोत्सवात मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. यावेळी त्यांचे ओझर येथे विमानाने आगमन होईल. त्यानंतर ते हेलिकॅप्टरने ओझर येथून छत्रपती संभाजीनगर रोडवरील (औरंगाबाद रोड) निलगिरी बाग येथील मैदानावर येतील.
येथून ते मोटारीने तपोवनातील साधुग्राम येथील कार्यक्रमस्थळी जातील. निलगिरी बाग ते साधुग्राम या सुमारे अडीच कि.मी. अंतरादरम्यान, सुमारे एक ते दीड कि.मी. अंतरावर रोड शो करण्यात येणार असल्याचे समजते. परंतु त्यावर अद्यापपर्यंत शिक्कामोर्तब झालेला नाही. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजीचे पथक तैनात असते. याच पथकाच्या सूचनेनुसार पंतप्रधान यांच्या दौर्यातील नियोजित स्थळांची पाहणी केली जाते.
त्यानुसार हे पथक येत्या मंगळवारी (ता.९) नाशिकला येणार आहे. या पथकाने केलेल्या पाहणीनंतरच पंतप्रधान मोदी यांच्या संभाव्य रोड शो करण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणेचेही लक्ष एसपीजी पथकाच्या दौर्याकडे लागले असून, त्यानंतरच रोड शोसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.
त्यानंतरच, पोलीस यंत्रणेला निलगिरी बाग ते साधुग्राम या मार्गावरील बंदोबस्ताचे नियोजन करावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान मोदी यांच्या दौर्यानिमित्ताने तयारीचा आढावा घेण्यासाठी नाशिकला येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.