सातपूर (जि. नाशिक) : पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद दिल्यामुळे रस्त्यावरील गर्दी(Crowd) पूर्णतः ओसरल्याचे चित्र होते. (Police action against break the rules in lockdown)
नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना चोप
सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांच्या नेतृत्वाखाली सातपूर पोलिस ठाणे सर्कल, पपया नर्सरी(Nursery), अशोकनगर पोलिस चौकी व रिलायन्स पेट्रोलपंप समोर(Petrol pump) , कामगारनगर अशा चार ठिकाणी कडक नाकाबंदी लावली आहे.तसेच गुन्हे शोध पथक मोबाईल व बिटमार्शल यांनी अशोकनगर, श्रीराम चौक, मौले हॉल, छत्रपती विद्यालय, सातपूर गाव, सातपूर कॉलनी, एमआयडीसी, कामगारनगर, श्रमिकनगर परिसरात पेट्रोलिंग(Patroling) करून विनाकारण फिरणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद दिला. तसेच त्यांना पुन्हा विनाकारण बाहेर न फिरण्याची समज देखील देण्यात आली. विशेष मोहिमेत वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांच्यासह नऊ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक व साठ अंमलदार विशेष परिश्रम घेताना दिसून येत आहे.
''आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करावे. कोणीही बिनकामाचे रस्त्यावर फिरू नये. पोलिसांची कारवाई २३ मेपर्यंत सुरू राहणार आहे.''
- किशोर मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सातपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.