Nashik Crime : शहरातील शाळा-महाविद्यालयालगत व रस्त्यांवर धुडघूस घालणाऱ्या रोडरोमियोंसह धुम्रपान करीत टवाळखोरी करणार्याविरोधात शहर पोलिसांनी शुक्रवारी (ता. १०) कारवाईचा बडगा उगारला.
दिवसभरात १९० टवाळखोर आणि कोटपाअन्वये १०६ जणांविरोधात दंडात्मक कारवाई करीत २५ हजार रुपयांचा दंड वसुल केला. (police action on roadromeo in city Action will also be taken against drunk drivers and smokers nashik crime)
शहरात अनेक शाळा-महाविद्यालये असून, याठिकाणी विद्यार्थ्यां व्यतिरिक्त काही रोडरोमिओंनीही गर्दी केलेली असते. शाळा-महाविद्यालयातून बाहेर पडणार्या विद्यार्थिनींची छेडछाडी केली जाते.
यासंदर्भात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये शुक्रवारी (ता. १०) सकाळपासून शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेच्या पथकाकडून रोडरोमिओंना पोलिसी हिसका दाखविला.
या विशेष मोहिमेदरम्यान १९० जणांविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तसेच, शाळा-महाविद्यालय परिसरापासून शंभर मीटर अंतरात असलेल्या पानटपर्यांवर प्रतिबंधित गुटखा, सिगारेट आढळून आल्याने अशा टपरी चालकांविरोधातही कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
तसेच, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणार्यासह टपरीचालक अशा १०६ जणांविरोधात कोटपाअन्वये कारवाई करीत २५ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
रोडरोमिओंसह पानटपरीचालक व धुम्रपान करणारे असे २९६ जणांवर पोलिसांनी धडक कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. सदरील कारवाई सातत्याने होण्याची अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.