ahmed and khan esakal
नाशिक

Nashik Crime: फसवणुकीच्या गुन्ह्यातील तोतयांच्या शोधासाठी पोलिसांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : शहरातील इस्लामपुरा भागातील मोहम्मद सलीम मुश्‍ताक अहमद यांच्या नावाने असलेला किंमती भूखंड त्यांच्या नावाचे बनावट कागदपत्र तयार करून फय्याज नवाब खान या तोतयाला विक्री केल्याचा प्रकार घडला होता.

छावणी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यात भूखंड खरेदी देणारा, घेणारा व साक्षीदार असलेले दोघे सगळेच ठग असून, या चारही संशयितांनी स्वत:चे नाव, पत्ते व खोटे ओळखपत्र देऊन हा व्यवहार केला.

यातील दोन प्रमुख तोतयांच्या शोधासाठी छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी आवाहन केले आहे. (Police appeal to trace missing persons in fraud cases Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

छावणी पोलिस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी छायाचित्रांच्या आधारे या संशयितांचा कसून शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत. फसवणूक व्यवहारातील बोगस खरेदी देणारा मोहम्मद सलीम मुश्‍ताक अहमद व बोगस खरेदी घेणारा फय्याज नवाब खान या दोघांचे छायाचित्र पोलिसांनी जाहीर केले आहेत.

छायाचित्राच्या आधारे शहरवासीयांना या संशयितांची ओळख पटल्यास त्यांनी छावणी पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असे छावणी पोलिसांनी कळविले आहे.

या संशयितांनी आणखी काही बनावट व्यवहार केले की काय, याशिवाय अन्य नागरिकांची फसवणूक टळावी या हेतूने या दोन भामट्यांचे छायाचित्र जारी करण्यात आले आहेत. ओळख पटल्यास छावणी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections 2024: काँग्रेसमध्ये थोरातांच्या नावाची चर्चा

Maharashtra Assembly Elections 2024: ‘इलेक्शन ड्यूटी’ नाकारल्यास जावू शकते नोकरी

Mahavikas Aghadi : ‘मविआ’चा घोळ कायम; तुर्त ‘८५’ च्या फॉर्म्युल्यावर एकमत; अन्य ३३ जागांवर चर्चा

Priyanka Gandhi : वायनाड हे माझ्यासाठी कुटुंबच; काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत पोटनिवडणुकीसाठी प्रियांका गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल

Maharashtra Assembly Elections 2024: नेत्यांनो, शिव्यांचा वापर करू नका!

SCROLL FOR NEXT