arrest team esakal
नाशिक

भागीदारालाच कोट्यवधींचा गंडा; रेणुका मिल्कच्या दोघा संचालकांना अटक

विनोद बेदरकर

न्यायालयाच्या आदेशाने दाखल झालेल्या या गुन्ह्यात अटकपूर्व अर्ज फेटाळल्यानंतर संशयित पोलिसांना गुंगारा देत होते.

नाशिक : भागीदारीत व्यवसाय थाटून भागीदारलाच कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या निफाड येथील रेणुका मिल्कच्या दोघा संचालकांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाच्या आदेशाने दाखल झालेल्या या गुन्ह्यात अटकपूर्व अर्ज फेटाळल्यानंतर संशयित पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर पोलिसांनी नैताळे (ता. निफाड) येथे संशयितांना जेरबंद केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Police arrested two directors of Renuka Milk for allegedly defrauding crores of rupees)


परशराम निवृत्ती पवार (वय ४०, रा. रामपूर आंबेवाडी- नैताळे) व विलास गंगाधर गुंजाळ (वय ४०, रा. जळगाव- काथरगाव) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी संदीप दत्तात्रेय आहेर (रा. पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दाखल केली आहे. मिल्क ट्रेंडिग व्यावसायिक आहेर यांच्या तक्रारीनुसार, दूध संघाच्या माध्यमातून २०११ मध्ये त्यांची विलास गुंजाळ यांच्याशी मैत्री झाली होती. त्यानंतर जोडधंद्याच्या संकल्पनेतून रेणुका मिल्क प्लांटची स्थापना करण्यात आली. २०१२ मध्ये भागीदारी पत्रात बदल करण्यात आले. व्यवसायासाठी संशयित परशराम पवार यांच्या पत्नीच्या नावे रामपूर (ता. निफाड) येथे जमीन खरेदी करण्यात आली. या ठिकाणी प्रकल्प सुरू करण्यासाठी आहेर यांनी सिडकोतील महानगर बँक, तसेच राजाराम वराळ आणि बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून लाखो रुपये जमविले. त्याबरोबरच खेळत्या भांडवलासाठी प्लांटवर दीड कोटींचे कर्ज काढण्यात आले.


संबंधित दोघा संशयितांकडे हा व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी असल्याने त्यांनी अल्पावधीतच तोटा झाल्याचे भासवून गैरव्यवहार केला. ही बाब लक्षात आल्याने आहेर यांनी दप्तर तपासणी केली असता, संशयितांनी एक कोटी ६५ लाख पाच हजार १८७ रुपयांचा गैरव्यवहार करून जमिनी घेतल्याचे पुढे आले. संशयितांची कानउघाडणी करताच त्यांनी अपहार केल्याचा लेखी कबुली जबाब दिला. वराळ आणि थोरात यांच्याकडून हातउसनवार घेतलेल्या रकमा आम्ही परत करू, असे आश्‍वासनही दिले. त्यानंतर संबंधितांनी मोठ्या रकमांची सहा महिन्यांत परतफेड करणे शक्य नसल्याचे सांगून हा प्लांट आम्हाला विकत द्या, त्याच्यावर कर्ज काढून तुमच्यासह हातउसनवार घेतलेले पैसे परत करण्याची ग्वाही दिली. त्यानुसार ३ जून २०१६ ला नव्याने भागीदारी संस्था स्थापन करून, त्यात नवीन सदस्य म्हणून नातेवाइकांना घेतले. या काळात संस्थेच्या गैरव्यवहारास आहेर जबाबदार असल्याचे भासवून संशयितांनी नातेवाइकांना कायदेशीर नोटिसा पाठविण्यास भाग पाडले. यानंतर मात्र संशयितांनी ठार मारण्याची धमकी देत गुंतवणुकीची रक्कम अदा करण्यास टाळाटाळ केल्याने आहेर यांनी न्यायालयात धाव घेतली होती.


अखेर या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी संशयितांनी जिल्हा न्यायालयासह उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, दोन्ही अर्ज फेटाळण्यात आल्याने संशयित फरारी झाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर शुक्रवारी पोलिसांनी नैताळे येथे दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दोघांना शनिवारी (ता. ५) कोठडीची मुदत संपणार असल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

(Police arrested two directors of Renuka Milk for allegedly defrauding crores of rupees)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी कायम राहणार का? जाणून घ्या आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Jammu Kashmir : ...तर काश्मीरमध्ये वेगळी स्थिती असती; उमर अब्दुल्लांकडून वाजपेयींची तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

SCROLL FOR NEXT