सिडको (नाशिक) : सर्व पैसे रॉलेट जुगारात हरलो असून, कर्जबाजारी झालो आहे. माफ करा, मी तुमची फसवणूक केली आहे असे मेसेजद्वारे कळविणाऱ्या व ४६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तरुणाविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मयूर पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी गौरव रमाकांत सिंग (३५ , नाशिक, मूळ रा. कोलकता) यांनी फिर्याद दिली आहे. सिंग यांच्याकडे ओळखी व्यक्ती मयूर गजमल पाटील याला घेऊन आले होते. तो अंबडला एका कंपनीमध्ये कामाला असल्याचे सांगितले. कंपनीला चांदीची गरज असते. तुम्ही चांदीचा व्यवसाय सुरू करीत असालतर ओळखीने जास्त ऑर्डर मिळवून देतो, असे मयूर पाटील याने सिंग यांना सांगितले. त्यानुसार २०१८ पासून सिंग यांनी सुगमा एंटरप्रायझेस नावाने सिल्व्हर मटेरिअल सप्लायचा व्यवसाय सुरू केला. त्यानुसार मयूर पाटील याच्या माध्यमातून कंपनीशी व्यवहार सुरू झाले. सुरवातीला ऑर्डर्सचे पेमेंट ऑनलाइन आल्यामुळे सिंग यांचा पाटील याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर मटेरिअल दिलेल्या कंपन्यांकडून सिंग यांना पूर्वीसारखे पेमेंट आलेले नाही. पाटील याने सिंग यांच्याप्रमाणेच अनेक जणांकडून चांदीचे मटेरिअल विकत घेऊन ते सराफ बाजारातील दोन व्यापाऱ्यांना ब्लॅकच्या भावाने विक्री करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, मयूरने सिंग यांना आपण पैसे रॉलेट जुगारात हरलो असून, कर्जबाजारी झालो आहे. माफ करा मी तुमची फसवणूक केली आहे, असे मेसेजद्वारे कळविले. त्यानुसार सिंग यांनी मयूरच्या घरी जाऊन चौकशी केली असता घरच्यांनाही तोच मेसेज आल्याचे समजले. मयूर पाटील याने विविध कंपन्यांच्या नावाने सिंग यांच्यासह सचिन उंडे, हरीश जोशी अशांकडून एकूण ६३. ०५ किलो चांदीचे मटेरिअल सुमारे ४६ लाख ४७ हजार १७२ रुपये किमतीचे चांदीचे मटेरिअल स्वतः:कडे घेऊन त्यांची फसवणूक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.