अंदरसूल (जि.नाशिक) : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची (corona infected) संख्या झपाट्याने वाढू लागल्याने राज्य सरकारने जिल्हाबंदी (lockdown) केली खरी, पण नाशिक-औरंगाबाद (highway checking) या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्यावर असलेल्या येवला तालुक्यातील खामगाव येथील सीमेवर आरोग्य तपासणी न करता फक्त ई-पासचीच (e-pass) तपासणी करून वाहने सोडली जात असल्याचा प्रकार समोर आला. (Police check e-pass at Nashik-Aurangabad border)
यावर ‘छुप्या मार्गाने ये-जा चाललीय’ हे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होऊनही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे खामगाव सीमेवर अजूनही एकही शिक्षक, आरोग्य कर्मचारी तपासणी करताना दिसत नाहीये. सुरवातीपासून पोलिसच ड्यूटी निभावत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनांचे प्रमाण अल्प असले तरी वैद्यकीयच्या नावाखाली वैजापूरहून येवल्याकडे उपचारासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. सीमाबंदीच्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात कुमकही दिसत नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.