Nashik News : राज्यासह देशातील राजकीय घडामोडी, शेतीमालास भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत.
यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. (Police Commissioner Ankush Shinde imposed preventive orders in city nashik news)
त्यानुसार ३० मे ते १३ जूनपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. या आदेशानुसार शहरात कोणालाही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, दगड, शस्त्रे, अस्त्रे, गावठी कट्टे, तलवारी, दांडे, काठ्या आणि अन्य प्राणघातक हत्यारे आणि वस्तू बाळगता येणार नाही.
कोणाच्याही फोटोचे, प्रतिकात्मक प्रेतांचे किंवा पुढाऱ्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करता येणार नाही. अर्वाच्य घोषणा, आवेशपूर्ण भाषण करता येणार नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वाद्य वाजवू नये, महाआरती, वाहनांवर झेंडे, पेढे वाटणे, फटाके वाजविणे, घंटानाद करणे, धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करता येणार नाही.
जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिकविधी, प्रेतयात्रा, सिनेमागृहासाठी लागू नाहीत. पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा किंवा मिरवणूक काढता येणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.