bribe case esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : 10 हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील पोलिस हवालदार हरी जानू पालवी यास तक्रारदाराकडून दहा हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तक्रारदार पिंपळगाव दाभाडी, (ता. चांदवड) येथील रहिवासी आहे. (Police constable caught by anti corruption bureau accepting bribe of 10 thousand nasik bribe crime)

तक्रारदार व त्यांचे भाऊ यांची रायपूर (ता. चांदवड) येथे शेत जमीन असून या शेत जमिनीतील एक सामाईक रस्त्याच्या वहीवाटीवरून त्यांच्या भावा भावांमध्ये वाद व हाणामारी होऊन त्यांच्यात परस्पर विरोधी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार यांच्यावतीने त्यांचे भाऊ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात संशयिताविरुद्ध वाढीव कलम लाऊन संशयितांना अटक करण्यासाठी हवालदार हरी जानू पालवी यांनी तक्रारदार यांच्याकडे वीस हजार लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी दूरध्वनीद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चांदवड येथे येऊन तक्रारदार यांची तक्रार नोंदविली. सदर तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान हवालदार हरी जानू पालवी यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. त्यापैकी दहा हजार चांदवड येथील गणुर चौफुली येथील एका चहाच्या दुकानावर स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, भूषण शेटे, भूषण खलाणेकर, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, प्रशांत बागूल, जगदीश बडगुजर, सुधीर मोरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT