नाशिक : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. तर, चार दिवसांवर छत्रपती शिवाजी महाराज जयंती येऊन ठेपलेली आहे. त्यातच, राजकीय पक्षाकडून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून शहरभर करडी नजर ठेवली जात आहे.
सध्या पोलिस ठाणेनिहाय शिवजन्मोत्सव समितीच्या बैठका घेतल्या जात असून, नियमांचे काटेकोर पालन करण्याचीही तंबी पोलिसांनी दिली आहे. (police eye on city Planning of endowment in background of upcoming Shiv Jayanti nashik news)
सोमवारी (ता. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. राज्यात राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ झालेली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या गट- तटांकडून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत.
यातून शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर कडेकोट नियोजन केले जात आहे. ठाणेनिहाय उत्सव समित्यांशी चर्चा करून त्यांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
कोणत्याही मंडळाने डीजेचा वापर करू नये, साउंड सिस्टीमचा आवाजदेखील मर्यादित ठेवावा, गुलालाऐवजी फुलांची उधळण करण्याची सूचना केली आहे. मुख्य मिरवणुकीसह नाशिक रोड, पंचवटी, सातपूर, अंबड, भद्रकाली या परिसरातून शिवजयंतीनिमित्त मिरवणुका विविध मंडळांकडून काढल्या जातील.
सर्वाधिक गर्दी भद्रकाली व नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीत मिरवणूक होणार असल्याने त्यानुसार बंदोबस्ताची आखणी पोलिसांकडून सुरू आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील टवाळखोरांसह उत्सव काळात गोंधळ करणाऱ्यांची धरपकड ठाणेनिहाय सुरू केली आहे.
साध्या वेशातील पोलिस, सीसीटीव्ही यासह सोशल माध्यमातून शिवजयंतीवर करडी नजर ठेवण्याचे नियोजन आयुक्तालयाने दोन्ही परिमंडळात केले आहे.
असे आहे नियोजन
- शांतता समितीच्या बैठकांमध्ये नियमांच्या सूचना
- मिरवणुकीत डीजे वाजविण्यास मनाई
- वाहतूक मार्गांची पोलिसांकडून होणार पाहणी
- मिरवणुकीवर असेल सीसीटीव्ही, ड्रोनची नजर
- पोलिसांचा फौजफाटा तैनात
- राज्य राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बॉम्बशोधक-नाशक पथकाची सज्जता
- साध्या वेशातील पोलिसांची नजर
"शिवजयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाणेनिहाय शांतता समितीच्या बैठका घेतल्या जात आहेत. जयंती उत्सव साजरा करताना मंडळांना महत्त्वाच्या सूचना देण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन होणार नाही याकडे पोलिसांचे बारकाईने लक्ष असेल."
- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.