Indian post News esakal
नाशिक

Nashik : टपाल पार्सल सेवेवर पोलिसांची करडी नजर!

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : टपाल विभागामार्फत देश- विदेशात पाठविल्या जाणाऱ्या पार्सल सेवेवर पोलिसांची करडी नजर आहे. दर महिन्याला पोलिस आयुक्त, ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयात बैठक घेतली जाते. त्यात पार्सल सेवेबाबत आढावा घेण्यात येत आहे. खबरदारीचे उपाय म्हणून या वर्षापासून पोलिस विभागाकडून आढावा घेण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. (Police keep watch on postal parcel service Nashik Latest Marathi News)

देश- विदेशात विविध प्रकारचे पार्सल पाठविण्यासाठी कमी खर्चात आणि विश्वसनीय विभाग अर्थात टपाल विभागाच्या पार्सल सेवेला नागरिकांकडून पसंती दिली जाते. पूर्वी नागरिक कार्यालय किंवा घरातूनच पार्सल पूर्णपणे बांधणी करून आणले जात होते. त्यामुळे आत काय आहे, याची माहिती पाठविणाऱ्या व्यतिरिक्त अन्य कुणासही राहत नव्हती. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडण्याची शक्यता होती.

परंतु देश- विदेशात घडणाऱ्या विविध घटना लक्षात घेता पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यांच्याकडून दर महिन्यास टपाल अधिकाऱ्यांकडून टपाल पार्सल सेवेचा आढावा घेतला जात आहे. यात केवळ टपाल विभागाचे अधिकारी नव्हे तर अन्नसुरक्षा, महसूल अधिकाऱ्यांसह पार्सल सेवेशी संबंधित विभागाचे अधिकारी या विशेष बैठकीस उपस्थित राहत असतात.

या वेळी टपाल पार्सल सेवेचे कार्य कशा पद्धतीने चालते. दैनंदिन किती पार्सल पोस्ट केले जातात. पार्सल जाण्याचे ठिकाण कुठले आहेत. त्यात अधिक पार्सल कुठल्या भागात जातात. पार्सल पाठविण्यापूर्वी टपाल विभागाचे अधिकारी, कर्मचारी कुठली खबरदारी घेत असतात. पार्सल पाठविणारे आणि ज्यांना पाठविले आहेत अशांची नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता अशा विविध प्रकारची माहिती नोंद केली जाते का, अशा सर्व बाबींचा आढावा पोलिस आयुक्त आणि ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्याकडून घेतला जातो.

इतर विभागांचीही काय भूमिका आहे. त्यांच्याकडून काय उपाययोजना केल्या जातात, याची सर्व माहिती पोलिस विभागास कळविण्यात येते का याची माहितीदेखील त्यांच्याकडून घेण्यात येते.

११ महिन्यात आठ बैठका

देश- विदेशात सध्या घडणाऱ्या घटना, बेकायदेशीर कृत्य लक्षात घेता या वर्षापासून अशा प्रकारचे बैठकांचे आयोजन केले जात आहे. जानेवारी २०२२ ते आतापर्यंत अर्थात ११ महिन्यात पोलिस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय याठिकाणी आठ बैठक झाल्या आहेत. असा आढावा घेतल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर आळा बसण्यास मदत होत आहे. त्यामुळे टपाल अधिकारीदेखील पार्सल पाठविण्यापूर्वी नागरिकांना त्यांच्यासमोर पार्सल बांधणी करण्यास सांगत आहे, अशा प्रकारची खबरदारी घेणे काळाची गरज झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT