Police stop farmers from protesting Written reply from Water Resources Department regarding Bhojapur flood water  esakal
नाशिक

Nashik: आंदोलन करण्यास शेतकऱ्यांना पोलिसांचा मज्जाव; भोजापूरच्या पूरपाण्यासंदर्भात जलसंपदा विभागाकडून पठडीतले उत्तर

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरणातून पूरपाणी सिन्नरच्या पूर्व भागातील दुशिंगपुर येथील बंधाऱ्यात पोचत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. १९) दुपारी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर वावी येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. (Police stop farmers from protesting Written reply from Water Resources Department regarding Bhojapur flood water Nashik)

पूरपाणी दुशिंगपूर बंधाऱ्यात आले असते, तर पूर्व भागातील निरहाळे, फुलेनगर, घोटेवाडी कहांडलवाडी या भागांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटला असता.

मात्र, पूरपाणी नगर जिल्ह्यात वितरित झाले. त्यामुळे वर्षानुवर्षे सिन्नरच्या शेतकऱ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी डॉ. विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्व भागातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता.

गुरुवारी सकाळी अकराला आंदोलक वावी-निरहाळे रस्त्यावरील समृद्धी अंडरपासजवळ जमा झाले. वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

शेतकरी जमा होऊ लागल्यावर श्री. लोखंडे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावले असून, त्यांच्याशी चर्चा करा व चर्चेतून मार्ग निघेल, अशी भूमिका घेतली. दुपारी एकपर्यंत जलसंपदा विभागाचे अधिकारी ‘आलो आलो’, असे उत्तर देत होते.

त्यामुळे संतप्त झालेल्या डॉ. शिंदे यांनी पोलिसांचा डोळा चुकवून थेट समृद्धी महामार्गावर धाव घेतली. शिर्डीहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर उभे राहून डॉ. शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकारी काढूपणा करीत असल्याचा आरोप केला.

आपण महामार्ग अडवला, म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांनी तिकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सर्वांना अटकाव केला. डॉ. शिंदे यांना समृद्धीवरून खाली आणले व वावी पोलिस ठाण्यात नेऊन स्थानबद्ध केले.

शेतकऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोध करेल त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा श्री. लोखंडे यांनी दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी माघार घेतली.

दुपारी दोनच्या सुमारास जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता सुभाष पगारे यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांनी उशीरा आल्याबद्दल रोष व्यक्त केला. जलसंपदाकडून पूर्व भागातील शेतकऱ्यांना नेहमीच सापत्नपदाची वागणूक देण्यात येते.

यंदा सोडलेले पूरपाणी नगरच्या पुढाऱ्यांनी पळविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. भाऊसाहेब शिंदे, महंत बबनराव सांगळे, सुधाकर शिंदे, गोटिराम सांगळे, विष्णू सांगळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न

अवकाळी पाऊस झाल्यास व भोजापूर धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहिल्यास ते पूरपाणी प्राधान्याने दुशिंगपूर बंधाऱ्यासाठी सोडण्यात येईल. पूरपाण्याचे आवर्तन सुरू असेल, तोपर्यंत पाणी शेवटापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची असेल.

पाऊस न पडल्यास येणाऱ्या रब्बी आवर्तनातून २४ तास पाणी दुशिंगपूरच्या चारीला सोडण्यात येईल, असे लेखी आश्वासन देऊन अभियंता पगारे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मोहोळमध्ये राजू खरे 29528 मतांनी आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT