नाशिक : नववर्षाच्या स्वागताच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही चोरीछुप्यारितीने सुरू असलेल्या अवैधरित्या मद्याची विक्री आणि जुगार अड्डयांवर पोलिसांनी छापे टाकून उद्ध्वस्त केले.
यात पोलिसांनी सुमारे २२ लाकांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर, रिसॉर्टवर सुरू असलेल्या पार्ट्यांच्या ठिकाणी पोलिसांनी अंमली पदार्थांची तपासणी करण्यासाठी स्निफर डॉगचा वापर केला. (Police strike on night of 31st Nashik Crime News)
जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या सूचनेनुसार नववर्षाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील 40 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. यात १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली.
जिल्हयातील महामार्ग, वर्दळीचे ठिकाणे, चेक पोस्ट या ठिकाणांवर बॅरिकेटस् लावून सतर्क नाकाबंदी करण्यात आली. हॉटेल्स, ढाबे, रिसॉर्ट या ठिकाणांवर फिक्स पॉईंट लावण्यात आले होते. दरम्यान, रिसॉर्ट चेक करण्यासाठी साध्या वेशातील पोलीस व दामिनी पथक तैनात होते. जिल्ह्यातील महामार्ग तसेच वर्दळीच्या ठिकाणांवर केलेल्या नाकाबंदीत प्रत्येक वाहन चालकाची मद्यपानाची तपासणी करण्यात आली.
त्यात १३४ केसेस करण्यात आल्या. ७९ हजार १०० रुपये दंड आकारण्यात आला. यासह मस्ती, गोंधळ घालणारे व ट्रिपलसीट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. ईगतपुरी, त्र्यंबकेश्वर, घोटी, वाडीवऱ्हे व नाशिक तालुका हद्दीतील रिसॉर्ट, हॉटेलमधील पार्टींवर पोलीसांची नजर होती.
पोलिस ठाण्यांचे अधिकारी, त्यांचा बंदोबस्त, दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल (क्यूआरटी), जिल्हा वाहतूक शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय स्तरावरील पथके, विशेष पथके, साध्या वेशातील पोलिस, डॉग स्क्वॉड असा चोख बंदोबस्त तैनात होता.
ठिकठिकाणी छापामारी
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध मद्याची विक्री व वाहतूक करताना डझनभर संशयितांची धरपकड करीत जिल्हाभरात ५३ केसेस दाखल करण्यात आल्या. यातून ७ लाख ८४ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्याचप्रमाणे जिल्ह्यात सात ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे मारत गुन्हे दाखल करुन जुगारींना ताब्यात घेतले. यात १४ लाख १ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला आहे. तसेच सीआरपीसीप्रमाणे १८ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या.
"जिल्ह्यात अवैध व्यवसायांविषयी नागरिकांना काही माहिती द्यावयाची आहे. त्यांनी जिल्हा पोलिस दलाच्या ६२६२२५६३६३ या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव विचारले जाणार नाही व त्याची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल."
- शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.