नाशिक : मोकळी मैदाने, क्रीडांगणे अन् उद्यानांमध्ये पार्ट्या करीत, मौजमस्ती करीत धिंगाणा घालण्याऱ्यासह चौका-चौकात टवाळखोरी करण्याऱ्यावर पोलिसांनी कारवाई करीत दंडुक्याचा प्रसाद दिला आहे.
गेल्या तीन दिवसांमध्ये शहर पोलिसांनी आयुक्तालय हद्दीत सर्च ऑपरेशन राबवून सुमारे हजार टवाळखोरांविरोधात कारवाई केली. (police took action against boys who spoil city peace nashik crime news)
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार घेतल्यापासून शहर आयुक्तालय हददीमध्ये सातत्याने अचानकपणे टवाळखोरांविरोधात कारवाई सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये पोलीसांनी १ हजार ७९ टवाळखोर व मद्यपींना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीमच राबविली.
या कारवाईमध्ये गेल्या तीन दिवसात परिमंडळ एकमध्ये ४९२ तर, परिमंडळ दोनमध्ये सर्वाधिक ५८७ टवाळखोरांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे.
परिमंडळ एकअंतर्गत सरकारवाडा, भद्रकाली, गंगापूर, आडगाव, म्हसरुळ, मुंबईनाका आणि पंचवटी पोलीस ठाण्याच्या हददीत पोलीस ठाणेनिहाय व शहर गुन्हेशाखेच्या पथकाने कारवाई केली तर, परिमंडळ दोनअंतर्गत अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड व देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस ठाणेनिहाय व शहर गुन्हेशाखेच्या गुंडा व दरोडाविरोधी पथकांनी कारवाई केली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे मोकळ्या मैदाने, क्रीडांगणे, उद्यानांमध्ये टवाळखोरी करीत पार्ट्या करण्याऱ्याना चाप बसला आहे.
कारवाईची आकडेवारी
तारीख.......परिमंडळ - १.......परिमंडळ-२........एकूण
२१ डिसें.......२०६.........२३६......४४२
२२ डिसें.......१६६........२१२.....३७८
२३ डिसें.......१२०........१३९......२५९
एकूण.........४९२........५८७........१०७९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.