Police  sakal
नाशिक

Nashik Police Transfer : आयुक्तांच्या आदेशाने उचलबांगडी; उपायुक्त खांडवी मुख्यालयात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Transfer : त्रिमूर्ती चौकातील वाहनाच्या तोडफोडीला आठवडा होत नाही तोच बोधलेनगरला खून आणि विहितगावातील वाहनांच्या तोडफोडीच्या घटनेमुळे परिमंडल दोनचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि सहाय्यक पोलिस आयुक्त अंबादास भुसारे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

तर परिमंडळ दोनची जबाबदारी मोनिका राऊत यांच्याकडे देण्यात आली असून, सहाय्यक आयुक्तपदी काही दिवसांपूर्वीच आयुक्तालयाच्या विशेष शाखेत हजर झालेले आनंदा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.(police transfer Deputy Commissioner Khandvi transfer to headquarters nashik news)

दरम्यान, सदरील बदल्या या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात गुन्हेगारीवर अंकुश नसल्यानेच या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे बोलले जाते.

परिमंडळ दोनमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. उपनगरहद्दीतील वृद्ध महिलेच्या खुनाची दीड महिना उलटूनही उकल झालेली नाही. टवाळखोरांविरोधात कारवाई होत नसल्याने सातत्याने अंबड, उपनगर आणि नाशिक रोड या पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये टवाळखोरांच्या कुरापती वाढल्या आहेत.

गेल्याच आठवड्यामध्ये अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्ती चौकातील शिवशक्ती चौकात १६ चारचाकी गाड्यांची दोन टवाळखोरांनी तोडफोड, तसेच कोयताधारी संशयितांकडून भरदिवसा दहशत माजविण्याचेही प्रकार घडत होते.

त्यापाठोपाठ दोन दिवसांपूर्वी बोधलेनगर येथे १८ वर्षीय युवकाची भररस्त्यावर चॉपरने वार करून टोळक्याकडून खून करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर, सोमवारी (ता.२४) पहाटे दोनच्या सुमारास दोन संशयितांनी विहितगावात एका सोसायटीच्या पार्किंगमधील वाहनांची जाळपोळ करीत रस्त्यावरील चारचाकी वाहनांचीही तोडफोड केली. या साऱ्या घटनांनी परिमंडळ दोनमध्ये पोलिसांचा वचकच न राहिल्याने टवाळखोरांनी डोके वर काढले.

याची गंभीर दखल पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेत सहाय्यक आयुक्त भुसारे यांची आयुक्तालयातील विशेष शाखेत बदली करण्यात आली असून, विशेष शाखेचे सहाय्यक आयुक्त आनंदा वाघ यांच्याकडे विभाग चारच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयुक्तांनी केलेल्या या बदलीमुळे आयुक्तालयातील अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे.

आयुक्तांसमोर सर्व समान

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आतापर्यंत पोलिस अंमलदारांच्या थेट मुख्यालयात उचलबांगडी केली आहे.

परंतु परिमंडळातील वाढत्या गुन्हेगारीला जबाबदारी धरून थेट उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांचीच बदली केल्याने अधिकाऱ्यांनाही इशाराच दिला आहे.

आयुक्तालयात होणाऱ्या बैठकांमध्ये आयुक्तांकडून नेहमीच ज्या बिट, पोलिस ठाण्यात गुन्हेगारी वाढेल त्या संबंधित पोलिस अंमलदार व अधिकाऱ्यांची मुख्यालयात बदल्या करण्याचे इशारे दिले आहेत.

त्यानुसार नुकतीच नाशिक रोडच्या गुन्हे शोध पथकातील १२ अधिकारी-कर्मचाऱ्यांची, तर त्यापूर्वीही पंचवटी, सातपूर आणि अंबडच्या कर्मचाऱ्यांना दणका बसला आहे. ते अजूनही मुख्यालयातच आहेत. त्यामुळे आयुक्तांचा इशारा अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना समान असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT