नाशिक : दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक वाडे, घरे स्वतःहून उतरवून घेण्याच्या सूचना महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांमार्फत घरमालक, भाडेकरूंना पाठविल्या जातात.
यातून भविष्यात कायदेशीर अडचणीत सापडू नये याची तजवीज असते. परंतु, यंदा उन्हाळ्याच्या सुरवातीलाच धोकादायक इमारती उतरवून घेण्याच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे मालक किंवा भाडेकरूंनी स्वतः न उतरविल्यास पोलिस बंदोबस्त लावून मिळकती उतरविल्या जातील व त्याचा खर्च संबंधितांकडून वसुल केला जाईल इशाराच देण्यात आला आहे. (Police will take down dangerous mansions Decision of NMC Commissioner Nashik News)
शहरात एक हजारांहून अधिक धोकादायक इमारती व वाडे आहेत. बहुतांश वाडे जुने नाशिक व पंचवटी भागात आहेत. वाडे ढासळण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते.
त्यामुळे सहा विभागीय कार्यालयांच्या मार्फत धोकादायक वाडे खाली करण्याच्या सूचना दिल्या जातात. परंतु, एकदा नोटीस बजावल्यानंतर त्याकडे फारसे महापालिका किंवा त्या जागेत राहणारे भाडेकरू, मालक लक्ष देत नाही.
एखादी दुर्घटना घडल्यास महापालिकेचे अधिकारी नोटीस बजावण्याचे कारण देवून हात वर करतात. आर्थिक नुकसान किंवा जागेवरील दावा जाईल म्हणून तेथे राहणारे घर सोडत नाही. परंतु महापालिकेने आता वाड्याबाबत ठोस धोरण स्वीकारले आहे.
तीस वर्ष पूर्ण झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करून ती जागा राहण्यासाठी योग्य आहे की नाही याबाबत सर्टिफिकेट घ्यावे त्यानंतरच निर्णय घ्यावा. राहण्यासाठी योग्य घर नसल्यास त्या जागेत वास्तव्य करू नये किंवा नवीन इमारत बांधावी अशा स्पष्ट सूचना आहेत.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
परंतु, याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. दुर्घटना घडल्यानंतरच विषय चर्चेला येतो. परंतु आता महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मागील आठवड्यात अशोकस्तंभावरील वाडा पडल्यानंतर गांभिर्याने घेत शहरातील धोकादायक इमारती, घरे, मोडकळीस आलेल्या जुने वाडे उतरवून घ्यावे, वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी सुरक्षित जागी स्थलांतरित व्हावे.
अशा सूचना केल्या आहेत. अन्यथा पोलिसांच्या मदतीने इमारती मोकळ्या केल्या जातील असा इशारा दिला आहे.
"घरमालक, भाडेकरूंनी धोकादायक इमारती, घरे, वाडे स्ट्रक्चरल कन्सल्टंटची मदत घेऊन उतरवून घ्यावे. अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांचे कलम २६८ नुसार पोलिसांच्या मदतीने इमारती मोकळ्या केल्या जातील."- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महापालिका.
विभाग धोकादायक घरे, वाडे
पश्चिम ६००
पंचवटी १९८
पूर्व ११७
नाशिकरोड ६९
सातपूर ६८
सिडको २५
--------------------------------------------------
एकूण १०७७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.