Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : मुख्यालयात पोलिस कर्मचाऱ्यास बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर रोडवरील पोलिस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये काढण्यात आलेल्या साई पालखीसमोर फटाके फोडण्यावरून हटकले असता, त्याचा राग धरून चौघांनी पोलिस कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. २५) रात्री घडली.

सरकारवाडा पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल होण्याऐवजी अदखलपात्र गुन्हा करण्यात आला आहे. दरम्यान, मिरवणुकांना परवानगी नसताना वसाहतीमध्ये पालखी मिरवणुकीला परवानगी कोणी दिली, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

प्रकाश खंडू अहिरे (रा. पोलिस मुख्यालय वसाहत, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, पोलिस वसाहतीमध्ये साई पोलिस बॉईज या नावाने पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांची संघटना आहे. शुक्रवारी (ता.२५) सायंकाळी साई पोलिस बॉईजतर्फे साई पालखीचे आयोजन करण्यात आले होते. (Policeman Brutally beaten at headquarters Nashik Crime News)

या निमित्ताने पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीसमोर फटाके फोडण्यात येत होते. तर,एका चौकात रस्त्यालगतच लहान मुलेही खेळत होते. त्यावेळी तक्रारदार अहिरे यांनी फटाक्यांमुळे लहान मुलांना त्रास होत असून फटाके फोडू नका, समजावून सांगितले. त्याचा पालखी मिरवणुकीतील चौघांना राग आला आणि त्यांनी अहिरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि घटनास्थळावरून पोबारा केला.

या प्रकरणी अहिरे यांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून साई पोलिस बॉईजच्या चौघा संशयितांविरोधात तक्रार दिली. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल न करता, अदखलपात्र नोंद केली आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

मिरवणुकीला परवानगी होती का?

ऐरवी कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीसाठी पोलिस परवानगी बंधनकारक असते. परवानगी नसल्यास गुन्हा दाखल केला जातो. पोलिस वसाहतीमध्ये काढण्यात आलेल्या या साई पालखीसाठी परवानगी काढण्यात आली होती का, असा प्रश्न वसाहतीतील नागरिकांनीच विचारला आहे. पोलिस बॉईजबाबत नेहमीच तक्रारी असतात, परंतु त्या कोणीही गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे पोलिस बॉईजची मुजोरी वाढल्याचेही बोलले जाते.

तक्रारदार सरकारवाड्यातीलच कर्मचारी

तक्रारदार अहिरे यांची सरकारवाडा पोलिस ठाण्यातच नियुक्ती आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्याच पोलिस वाहनावर ते चालक आहेत. पोलिस कर्मचाऱ्यालाच मारहाण होऊन त्यासंदर्भात गुन्हा दाखल होत नसेल तर सर्वसामान्यांनी पोलिस ठाण्यात कोणाच्या भरवशावर तक्रार घेऊन जायचे असाही सवाल यानिमित्ताने उभा राहतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT