Political Astrology of Ajit Pawar & Devendra Fadanvis esakal
नाशिक

Political Astrology: फडणवीस-अजितदादांची मैत्री राजकारणात दीर्घकाळ दिसणार! दोघांना राजकीय उच्चपदाचे योग

ज्योतिष वाचस्पतींचे राज्यातील परिस्थितीवर भाकीत

- प्रशांत कोतकर

Political Astrology : राज्यातील राजकीय अस्थिरता बघता नाव, राशी, कुंडली काय सांगतात, याचा शोध घेतला असता राज्याच्या सध्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोघांमध्ये नैसर्गिक मैत्री असून, राजकारणात ती दीर्घकाळ दिसेल, असे भाकीत ज्योतिषवाचस्पती डॉ. नरेंद्र धारणे यांनी केले आहे. (Political Astrology Fadnavis Ajit pawar friendship will seen in politics for long time Both have high political positions nashik)

१० नोव्हेंबरच्या अंकात राजकीय अस्थिरतेचे दिलेले संकेत

डॉ. धारणे यांनी सांगितले, की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांची रास कुंभ आहे. पण जन्म नक्षत्र वेगळे आहे. तसेच दोघांचा वाढदिवसही जुलैमध्येच येतो. त्यामुळे दोघांमध्ये नैसर्गिक मैत्री आहे.

ती राजकारणात दीर्घकाळ दिसेल. अजितदादा आणि फडणवीस या दोघांना साडेसाती चालू आहे. दोघांच्या कुंडलीत शनी बलवान आहे. त्यामुळे चालू साडेसाती दोघांना राजकीय उच्चपद देईल, असे योग आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीतील सध्याची स्थिती

अजितदादांना राजयोग

राज्यातील चालू राजकीय घडामोडींत नजीकच्या काळात अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे योग आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रास धनू असून, मूळ नक्षत्र, शुक्र, गुरू युती राजयोगमुळे ते उच्चपदी विराजमान आहेत.

तो राजयोग गोचर ग्रहस्थितीनुसार सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे ते त्या पदावर राहतीलच, असे कुंडलीवरून वाटत नसल्याचे स्पष्ट मत डॉ. धारणे यांनी व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीतील सध्याची स्थिती
अजित पवार यांच्या कुंडलीतील सध्याची स्थिती

विरोधी पक्षाच्या भूमिकेतच राहावे लागणार

खासदार सुप्रिया सुळे यांची रास धनू, तर उद्धव ठाकरे यांची सिंह रास असून, राज ठाकरे यांची तुला रास आहे. या तिघांच्या कुंडलीत सध्या तरी सत्ता मिळण्याचे राजयोग नाहीत.

त्यामुळे पुढील सात वर्षे त्यांना विरोधी पक्षाच्या भूमिकेतच राहावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आगामी सहा महिन्यांत आरोग्य समस्येमुळे राजकीय निवृत्ती घेतील, असेही भाकीतही डॉ. धारणे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT