Nashik ZP News  esakal
नाशिक

ZP Recruitment : राज्यातील राजकीय अस्थिरतेचे जि. प. भरतीवर सावट! जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने संभ्रम

सकाळ वृत्तसेवा

ZP Recruitment : राज्यातील हजारो तरुण जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या भरती प्रक्रियेवर राज्यातील राजकीय अस्थिरतेचे सावट आले आहे. जिल्हा परिषद भरतीचे जाहीर झालेल्या वेळापत्रकाप्रमाणे 1 ते 7 मे दरम्यान जाहीर प्रसिद्ध होणार होती.

मात्र, आठवडा संपत आलेला असताना देखील भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. (Political instability in state on ZP recruitment Confusion over ad not being published nashik news)

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून ४ मे २०२० च्या शासननिर्णयान्वये राज्यात भरती प्रकिया बंद करण्यात आली. मात्र कोरोना संकट कमी झाल्याने सर्व सुरळीत होत असताना आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला असून, १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी संबंधित पदे भरावयाची आहेत.

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गांच्या पदभरती कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादित दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आली आहे.

त्यानुसार सर्व पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. पदभरतीसाठी आयबीपीएस कंपनीबरोबर सामंजस्य करार देखील गत महिन्यात झाला आहे. यानंतर, जिल्हा परिषदेची भरती १ ते ७ मे दरम्यान जाहिरात प्रसिद्ध करून कार्यवाही सुरू होईल, असे संकेत दिले होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तसेच या भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चार महिने लागणार असून, तसेच या संपूर्ण भरती प्रक्रियेसाठी किमान ३ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. याकरिता नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीची पुणे येथे बैठक होऊन यात परिक्षा, त्याचा अभ्यासक्रम आदींवर चर्चा देखील झाली.

त्यामुळे वेळापत्रक प्रसिद्धीचा इच्छुकांना प्रतिक्षा लागलेली आहे. परंतु, ५ मे उजाडून देखील वेळापत्रक जाहीर झालेले नाही. यातच १६ आमदारांच्या अपात्रतेची अंतिम सुनावणी ही १० मे दरम्यान होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

यानंतर, राज्यात सत्तांतर होणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. या जर-तर च्या चर्चेचा परिणाम भरतीवर होत असल्याचे बोलले जात आहे. यातच वेळापत्रक देखील जाहीर होत नसल्याने घालमेल वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

Bandra East Assembly Constituency Results: 'मातोश्री'च्या अंगणात पुन्हा शिवसेना? वरुण सरदेसाई यांनी मारली मुसंडी; झिशान सिद्दीकी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT