Gram Panchayat esakal
नाशिक

Nashik News : गावगाड्याच्या निवडणुकीने राजकीय कुरघोड्या; गुलाबी थंडीत गावांमध्ये राजकारण तापले

सकाळ वृत्तसेवा

चांदोरी (जि. नाशिक) : गुलाबी थंडीत ग्रामपंचायत निवडणुकीने निफाड तालुक्यातील गावपातळीवरील राजकारण चांगलेच तापले आहे. गाव नेत्यांनी आपल्या गटात आपले ऐकणारे उमेदवार उभे करून अनेकांना शेवटपर्यंत शब्द देवून झुलवत ठेवल्याचे चित्र देखील दिसत आहे. आपल्या मर्जीतील ताफा गावपातळीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच होण्यासाठी सज्ज करून मतदारांची राजीखुशी राखत विजयाची बाजी मारण्यासाठी राजकीय रणांगणात डावपेच आखले जात आहे. निवडणुकीमुळे गाव पातळीवर राजकीय गणिते करण्यात स्थानिक नेते व्यस्त असून कुरघोड्या वाढल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. (politics heated up in villages over gram panchayat eleciton nashik Latest Marathi News)

निवडणूक म्हटले की, राजकारण आलेच. एरवी एकमेकांशी गुण्या गोविंदाने नांदणारे ग्रामस्थ गावच्या निवडणुकीत एकमेकांचे पॅनल बदलले असल्याने बघूनही काणाडोळा करताना दिसून येत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराची कमजोरी आणि राजकीय आडाखे ओळखून शह कट करण्यात परस्पर विरोधी उमेदवारांचे कार्यकर्ते सध्या गावपातळीवर काम करत आहे. निफाड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये दिसणारे हे चित्र राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चांदोरी, नागापूर ग्रामपालिका निवडणुकीत दिसत असून या ठिकाणी दोन पॅनल निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहे.

सरपंचपदासाठी अपक्ष ही रिंगणात

सुरवाती पासून सेनेच्या गटाकडून सरपंचपदाचे उमेदवार असलेल्या विनायक खरात यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. सरपंचपदाचा शब्द न मिळाल्याने पुन्हा स्वगृही परतत सेनेकडून उमेदवारी कायम ठेवली. गेल्या अनेक वर्षांची ग्रामपालिकेवर अनेक वर्षांची सत्ता असलेल्या राष्ट्रवादीच्या गटाकडून संजय गायखे रिंगणात आहे. स्वराज्य संघटनेच्यावतीने शिवाजी मोरे उमेदवारी करत असून अपक्ष म्हणून विनायक नाठे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

नमस्कार-चमत्काराने मनधरणी

सध्या ग्रामपंचायत निवडणुकींचा धुराडा पेटल्यामुळे प्रत्येक गावात माणुसकीला उधाण आलेले आले आहे. नमस्कार-चमत्कार करून मतदारांची मनधरणी केली जात आहे. अडचणीला हातभारही लावला जात आहे. परिसरातील सर्वच व्यावसायिकांचे धंदे जोमात सुरू असून,हॉटेलवर गर्दी होत आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवसात माणुसकीला उधाण आलेले असल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT