Admission esakal
नाशिक

Sakal Exclusive : पॉलिटेक्‍निकला 62, डी. फार्मसीला 71 टक्‍के जागांवर प्रवेश; नाशिक विभागातील चित्र

अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा

Sakal Exclusive: दहावी, बारावीनंतर पदविका अभ्यासक्रमाचे पर्याय उपलब्‍ध आहेत. गेल्‍या काही वर्षांमध्ये पदविका अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढता आहे. नाशिक विभागात अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण शाखेतील पदविका शिक्षणक्रम असलेल्‍या पॉलिटेक्‍निकला ६२ टक्‍के, तर औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रम डी. फार्मसीच्‍या ७१ टक्‍के जागांवर प्रवेश झाले आहेत.

काही वर्षांपासून पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी, पालकांची पसंती वाढत आहे. अभियांत्रिकीच्‍या थेट द्वितीय वर्षात प्रवेशाचा पर्याय किंवा पदविकेनंतर नोकरीची संधी उपलब्‍ध असल्‍याने त्याकडे कल वाढत असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे. (Polytechnic 62 D pharmacy Admission to 71 percent seats in nashik news)

औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रमाला सीईटी परीक्षा नसल्‍याने बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा कल या अभ्यासक्रमाकडे वाढत आहे. डी. फार्मसी या पदविका अभ्यासक्रमानंतर बी. फार्मसी शिक्षणाचा किंवा संशोधन, नोकरी असे भरपूर पर्याय उपलब्‍ध असल्‍याने पदवीपेक्षा पदविका अभ्यासक्रमाला प्राधान्‍य दिले जात असल्‍याचे आकडेवारीतून स्‍पष्ट होत आहे.

पदवीची प्रक्रिया लांबणे पथ्यावर

कोरोना महामारी व त्‍यानंतरच्‍या कालावधीतही विविध कारणांनी पदवी अभ्यासक्रमाची प्रक्रिया लांबली होती. दुसरीकडे पदविका अभ्यासक्रमांची प्रक्रिया वेळेवर सुरू करताना ‘डीटीई’तर्फे वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. परिणामी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्‍या संख्येत वाढ झाली आहे.

एसएससी डिप्लोमा प्रवेशाची स्‍थिती

जिल्‍हा प्रवेश क्षमता प्रवेश घेतलेले विद्यार्थी

नाशिक ८,९२६ ६,०६३

नगर ८,०५८ ४,७६७

जळगाव ३,८१७ २,२३३

धुळे २,५०८ १,६९७

नंदुरबार १,३७१ ४९३

एकूण २४,६८० १५,२५३

डी.फार्मसी प्रवेशाची स्‍थिती अशी-

जिल्‍हा प्रवेश क्षमता प्रवेश घेतलेले विद्यार्थी

नाशिक ३,०८४ २,११३

नगर ३,३३६ २,१९७

जळगाव १,६३८ १,२१३

धुळे १,५१२ १,२११

नंदुरबार ५६७ ४९२

एकूण १०,१३७ ७,२२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT