pomegranate esakal
नाशिक

Pomegranate Rates Fall: पूर परिस्थितीमुळे डाळिंबांच्या दरात घसरण; उच्च प्रतीचा डाळींब 25 ते 40 रुपयांनी स्वस्त

सकाळ वृत्तसेवा

Pomegranate Rates Fall : दिल्लीसह उत्तर भारतात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पुर परिस्थिती आहे. याचा परिणाम हा दळणवळणवर देखील झाला असून ‘कसमादे’च्या डाळिंबाला देखील याचा फटका बसला आहे.

यामुळे डाळींबांच्या दरात कमालीची घसरण होत आहे. किलोमागे डाळिंबांच्या दरात २५ ते ४० रुपयांची घट झाली आहे.

उच्च प्रतीचा डाळिंबाचा दर १६० रुपये किलोवरुन १२५ रुपयापर्यंत तर मध्यम प्रतीचा डाळिंब १०० रुपयांवरून ६० ते ७० रुपयापर्यंत खाली आला आहे. (Pomegranate rates fall due to flood conditions High quality pomegranates cheaper by Rs 25 to 40 nashik)

यावर्षी कसमादेवर पाऊस रुसला आहे. विभागात दुष्काळाचे ढग दिवसागणिक घट्ट होत आहेत. शेतकरी रोज पावसाची प्रतिक्षा करीत आहे. शेतातील विविध भागात महिन्यापासून पाऊस उसंत घेत नाही.

दुसरीकडे पडणाऱ्या पावसाचा फटका कसमादेतील डाळिंब उत्पादकांना बसत आहे. गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या पावसाने हाह:कार उडविला. दिल्लीचा फळबाजार अनेक दिवस बंद होता.

मुसळधार पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने रस्ते व पूल पाण्याखाली आले आहेत. याचा मोठा परिणाम दळणवळणावर झाला आहे. सातमाने (ता. मालेगाव) येथील रवींद्र पवार यांचा डाळिंब बांगलादेशात निर्यात होते.

कसमादेतील डाळिंब ट्रकने देशांतर्गत बाजारपेठांमध्ये जातो. पुर परिस्थितीमुळे मोठ्या बाजारपेठा कधी बंद तर कधी सुरु अशा अवस्थेत आहे. यामुळे दरात घट झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महिन्यापूर्वी उच्च प्रतिचा डाळिंब १५० ते १६० रुपये किलोने विकला गेला. सध्या ११० ते १२५ रुपये भाव मिळत आहे. मध्यम व साधारण प्रतीचा डाळिंबाचे भावही घसरले आहेत.

राज्यातील कसमादे, संगमनेर, जालना, सोलापूर, सांगोला, छत्रपती संभाजीनगर आदी भागातून डाळिंबाची आवक वाढली आहे. त्यातच गुजरातचा डाळींबही बाजारात आला आहे.

सध्या कसमादेत डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शेतकरी मालाची काढणी करीत आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर भावात सुधारणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

"पुर परिस्थितीमुळे डाळिंब निर्यातीला अडचणी येत आहेत. बांगलादेशमध्ये निर्यात सुरु झाली आहे. राज्यात यावर्षी डाळिंबाचे उत्पादन वाढले. गुजरातमध्येही चांगले उत्पादन आहे. देशांतर्गत पुर परिस्थिती व आवक वाढल्याने भाव कमी झाले. सप्टेंबरमध्ये पुन्हा भाव वाढू शकतील. शेतकऱ्यांनी तेल्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात."

- रवींद्र पवार, डाळिंब उत्पादक, सातमाने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पराभवाची हॅट्‌ट्रिक करायची असेल, तर राजन तेलींनी निवडणूक लढवावी'; दीपक केसरकरांचं थेट चॅलेंज

Latest Maharashtra News Updates Live : मुंबईत सर्वाधिक जागा भाजपला मिळणार?

जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामी समर्थ मृत ब्राम्हणाला देणार जीवनदान ; प्रोमोची होतेय चर्चा

Chh.Sambhajinagar Assembly election 2024 : छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात समस्यांचे बुरूज

Gold-Silver Price: दिवाळी अगोदर सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावर; चांदीही 1,000 रुपयांनी वाढली, भाववाढीचे कारण काय?

SCROLL FOR NEXT